शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पक्षात परत येतो, पण मुख्यमंत्री कराल का? गुलाम नबी आझाद पुन्हा काँग्रेसमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 08:48 IST

गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे. गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा  आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे.

- सुरेश डुग्गरजम्मू : विधानसभा निवडणुकीची घाेषणा हाेताच जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकीकडे काॅंग्रेसने नॅशनल काॅन्फरन्स (एनसी) आणि पीडीपीसाेबत आघाडी स्थापन करण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे पक्षातून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांची घरवापसी करविण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आझाद यांच्याशी चर्चा करण्यास सांगण्यात आले. गुलाम नबी आझाद यांनी पक्षात परतण्यासाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी अट ठेवल्याची चर्चा आहे.  गेल्या तीन महिन्यांत दुसऱ्यांदा आझाद यांच्या घरवापसीची चर्चा करण्यात येत आहे.

कोण येणार एकत्र ?भाजपचा पराभव करण्यासाठी समान विचारधारा असलेल्या पक्षांनी एकत्र यावे, अशी भूमिका घेत एनसी आणि पीडीपी एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहे.त्याचवेळी काॅंग्रेसनेदेखील या पक्षांसाेबत आघाडीचे संकेत दिले आहेत. काॅंग्रेसचे सरचिटणीस गुलाम अहमद मीर यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढविण्याची गरज आहे.

भाजप स्वबळावरजम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी हा निर्णय जाहीर केला. भाजपचे जम्मू-काश्मीर प्रभारी जी. किशन रेड्डी, सरचिटणीस तरुण चुघ आणि मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पक्ष काही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ शकताे, असेही रैना यांनी सांगितले.

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझाद