"Return my mercy petition"; The President of the Nirbhaya case pleaded guilty to the President | ''माझी दया याचिका परत करा''; निर्भया प्रकरणातल्या दोषीची राष्ट्रपतींकडे विनंती
''माझी दया याचिका परत करा''; निर्भया प्रकरणातल्या दोषीची राष्ट्रपतींकडे विनंती

नवी दिल्लीः निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मा यानं शनिवारी राष्ट्रपतींना एक याचिका पाठवली. त्या याचिकेच्या माध्यमातून त्यानं गृहमंत्रालयाकडून करण्यात आलेली दया याचिका मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं जी याचिका राष्ट्रपतींना पाठवली आहे, त्यात स्वाक्षरी नसून ती अधिकृत नाही, त्यामुळे राष्ट्रपतींनी ती परत पाठवावी. केंद्रीय गृहमंत्रालयानं निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्माची दया याचिका रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. गृहमंत्रालयानं दया याचिकेची अंतिम फाइल निर्णयासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली आहे.

दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतले उपराज्यपाल अनिल बैजल यांनी गृहमंत्रालयाचा एक रिपोर्ट पाठवला होता. ज्यात सांगण्यात आलं होतं की, दोषीला कोणत्याही परिस्थिती शिक्षा माफ करता येणार नाही. दिल्ली सरकारनंही विनयची याचिका फेटाळून लावली होती. 
2012मध्ये वैद्यकीय विद्यार्थिनीबरोबर दुष्कर्म आणि हत्या प्रकरणात दोषींपैकी विनयची शिक्षा माफ करण्याचा अर्ज करण्यात आला होता. आता याचिका फेटाळल्यानं विनयची फाशी निश्चित मानली जात आहे.



2012मध्ये घडलेल्या घटनेनं अख्खा देश हादरला होता. 23 वर्षीय युवतीवर दिल्लीमध्ये 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी बलात्कार केला होता. तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता हैदराबाद बलात्कार आणि उन्नाव दुष्कर्म प्रकरण समोर आल्यानंतर नागरिकांच्या रागाला पारावार उरलेला नाही. 2017मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दोषींची पुनर्विचार याचिका रद्द केलेली होती. 

Read in English

Web Title: "Return my mercy petition"; The President of the Nirbhaya case pleaded guilty to the President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.