शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
4
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
5
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
6
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
7
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
8
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
9
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
10
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
11
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
12
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
13
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
14
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
15
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
16
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
17
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
18
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
19
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
20
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर

Retail Inflation March 2023: सामान्यांना मोठा दिलासा; मार्च महिन्यात किरकोळ महागाई दर 5.66 टक्क्यांवर आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 19:29 IST

गेल्या दोन वर्षांपासून देशातील किरकोळ महागाईदर 6 टक्क्यांच्या वर होता, जी RBI ची सर्वोच्च मर्यादा आहे.

Retail Inflation March 2023: महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) गेल्या वर्षी मे महिन्यापासून कडक आर्थिक धोरण अवलंबत आहे. त्याचा परिणाम आता महागाईच्या आकडेवारीवरही दिसून येत आहे. सांख्यिकी आणि अंमलबजावणी मंत्रालयाने बुधवारी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाईची आकडेवारी जाहीर केली. मार्च 2023 मध्ये हा 6 टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. हा गेल्या 15 महिन्यांतील नीचांकी आहे.

गेल्या वर्षी महागाई दर 6.95 टक्के होतासरकारी आकडेवारीनुसार, मार्च 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 5.66 टक्के होता. डिसेंबर 2021 नंतरची ही नीचांकी पातळी आहे. भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या दरात झालेली घट हे त्याचे कारण आहे. मात्र, या काळात धान्याच्या दरात वाढ झाली आहे. या वस्तूंचा महागाई दर 15.27 टक्के आहे. महागाई दर 4 टक्के ठेवण्याचा आदेश आरबीआयला मिळाला आहे. आरबीआयने यासाठी किमान 2 टक्के आणि कमाल 6 टक्के मर्यादा निश्चित केली आहे. हा मार्च 2023 मध्ये 5.66 टक्क्यांवर आले आहे, तर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये ते 6.95 टक्के होता.

शहरी आणि ग्रामीण महागाई दरदुसरीकडे, शहर आणि गाव पातळीवर स्वतंत्रपणे पाहिल्यास, मार्च 2023 मध्ये, शहरी स्तरावर किरकोळ महागाईचा दर 5.89 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 5.51 टक्के होता. तर गेल्या वर्षी मार्चमध्ये हा अनुक्रमे 6.12 टक्के आणि 7.66 टक्के होता. तर फेब्रुवारी 2023 मध्ये शहरांमध्ये महागाई दर 6.10 टक्के आणि ग्रामीण पातळीवर 6.72 टक्के होता.

दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला होतागेल्या वर्षी एप्रिलमध्ये महागाई दर 7.79 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. 2023 च्या पहिल्या दोन महिन्यांची आकडेवारी पाहिली तर, जानेवारीमध्ये हा 6.52 टक्के आणि फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्के होता. किरकोळ चलनवाढीचा दर सलग तीन तिमाहीत 6 टक्क्यांच्या वर राहिला, फक्त नोव्हेंबर 2022 मध्ये तो 5.88 टक्क्यांवर आला होता. तर डिसेंबर 2021 मध्ये हा 5.66 टक्के होता.

खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्याग्राहक किंमत निर्देशांकात जेव्हा महागाईची गणना केली जाते, तेव्हा त्यात फूड बास्केटचा मोठा वाटा असतो. भूड बास्केटमधील महागाई मोजण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक तयार केला जातो. त्यानुसार मार्च 2023 मध्ये अन्नधान्य महागाईचा दर 4.79 टक्के होता, जो मार्च 2022 मध्ये 7.68 टक्के होता. तर फेब्रुवारीमध्ये हा आकडा 5.95 टक्के होता.

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारतReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक