शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 17:09 IST

पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली.

ठळक मुद्दे14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत., असे या ठरावात म्हटले आहे सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतोगेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे

नवी दिल्ली  - पुलवामा येथील भ्याड आत्मघाती हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली. तसेच दहशतवाद्यांविरोधात होणाऱ्या कारवाईत सरकारसोबत उभे राहण्याचे आश्वासन विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिले. तसेच दहशतावादाविरोधात त्रिसूत्री प्रस्ताव पारित करण्यात आला.  पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. त्यानंतर देशात संतापाची लाट उसळली असून, त्या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी तीन ठराव पास करण्यात  आले. 1 : 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दु:खाच्या देशवासीयांबसोबरच सर्व पक्ष शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत आहेत., असे या ठरावात म्हटले आहे. 2 :  सीमेपलीकडून दहशतवादाला मिळत असलेल्या सर्व प्रकारच्या पाठिंब्याचा आम्ही निषेध करतो. 3 :  गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा सामना करत आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेपलीकडून प्रोत्साहन मिळत आहे. भारत या आव्हानाचा मिळून सामना करत आहे. दहशतवादाविरोधातील या लढाईत आम्ही सुरक्षा दलांसोबत संपूर्ण शक्तिनिशी उभे आहोत. 

 दरम्यान, या बैठकीवेळी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या अध्यक्षांची बैठक आयोजित करावी, अशी मागणी केली. त्याला सर्व पक्षांना पाठिंबा दिला. तसेच एकजूट होऊन सुरक्षा दलांसोबत उभे राहण्याचे आश्वासन दिले. 

या बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह गृहसचिव राजीव गौबा, बीएसपी नेते सतीशचंद्र मिश्रा, आरजेडी नेते जेपी यादव, सीपीएमचे नेते टी. के. रंगराजन, फारुख अब्दुल्ला, के. वेणुगोपाल, टीआरएसचे नेते जितेंद्र रेड्डी, राम मोहन नायडू, गुलाम नबी आझाद, चंदू माजरा, नरेश गुजराल, टीएमसीचे डेरेक ओब्रायन, सुदीप बंडोपाध्याय, शरद पवार, आनंद शर्मा, संजय सिंह, शिवसेना नेते संजय राऊत, ज्योतिरादित्य शिंदे, उपेंद्र कुशवाह हे उपस्थित होते.   

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारतPoliticsराजकारण