शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

सीएए रद्द करण्याचा ठराव पंजाब विधानसभेत संमत; धार्मिक आधाराला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2020 5:41 AM

संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अशाच प्रकारचे आंदोलन पंजाबमध्येही शांततेने झाले.

चंदीगड : केरळपाठोपाठ पंजाब राज्याच्या विधानसभेनेही नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) रद्दबातल करावा, अशी मागणी करणारा ठराव शुक्रवारी संमत केला. पंजाबचे संसदीय कामकाजमंत्री ब्रह्म महिंद्र यांनी मांडलेल्या या ठरावावर विधानसभेत तीन तास चर्चा होऊन मग तो मंजूर करण्यात आला.

धार्मिक आधारावरील कायद्यामुळे समाजातील काही घटकांची भाषिक व सांस्कृतिक ओळख पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायदा केंद्र सरकारने रद्दबातल करावा अशी मागणी पंजाब विधानसभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आली आहे.

अशाच प्रकारचा ठराव देशात सर्वप्रथम केरळ विधानसभेने संमत केला होता. आता त्याचेच अनुकरण पंजाबने केले आहे. केरळमध्ये डाव्यांची, तर पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. पंजाब विधानसभेत या ठरावाला सत्ताधारी काँग्रेस व मुख्य विरोधी पक्ष आम आदमी पक्षाने पाठिंबा दिला, तर भाजपने जोरदार विरोध केला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये मुस्लिमांचाही समावेश करण्यात यावा, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाने केली.

धार्मिक छळामुळे पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानमध्ये होणाऱ्या धार्मिक छळाला कंटाळून पारशी, जैन, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, हिंदू धर्मीयांपैकी जे लोक ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात आश्रयाला आले, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या दुरुस्ती कायद्यात आहे. मात्र, त्यातून मुस्लिमांना वगळण्यात आले आहे. धर्मनिरपेक्षतेला धोकाहा ठराव मांडताना ब्रह्म महिंद्र यांनी सांगितले की, संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. अशाच प्रकारचे आंदोलन पंजाबमध्येही शांततेने झाले. त्यात समाजातील सर्व समाजांतील व धर्मांतील लोक सहभागी झाले होते. या कायद्यामुळे देशातील धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा धागा कमकुवत होऊ शकतो.

टॅग्स :Punjabपंजाब