शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

चित्रपटांच्या ऑनलाइन तिकीट विक्रीला विरोध

By admin | Updated: May 14, 2014 01:10 IST

शासननिर्णयाला सिनेमा एक्झिबिटर्स ॲण्ड ओनर्स असोसिएशनने विरोध दर्शविला असून, सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

थिएटर्सना सक्ती : संघटनेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेनाशिक : राज्यातील सर्व चित्रपटगृहांनी स्वत:ची ऑनलाइन तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी प्रेक्षकांकडून कोणताही अतिरिक्त सेवाकर आकारू नये, या शासननिर्णयाला सिनेमा एक्झिबिटर्स ॲण्ड ओनर्स असोसिएशनने विरोध दर्शविला असून, सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सरकारने ४ एप्रिल २०१३ रोजी ऑनलाइन संगणकीकृत तिकीट विक्रीचा आदेश काढला होता. त्याविरुद्ध उच्च न्यायालयात बिग ट्री एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड यांनी याचिका तसेच ॲड. सुनील लल्ला यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने राज्य सरकारच्या महसूल खात्याने राज्यातील सर्व चित्रपटगृहचालकांना ऑनलाइन तिकीट विक्री प्रणाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय दिला. राज्यातील सर्व चित्रपटगृहचालकांनी १ एप्रिल २०१४ पर्यंत ऑनलाइन तिकीट विक्रीची यंत्रणा उभारून प्रेक्षकांना तिकीट देताना कोणताही अतिरिक्त सेवाकर घेऊ नये, असे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर चित्रपटाची जाहिरात करताना त्यात ऑनलाइन तिकीट विक्रीबाबतचे संकेतस्थळ प्रसिद्ध करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. (प्रतिनिधी)निर्णयाला स्थगितीसंघटनेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अंतिम निकाल देईपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. शासन सक्ती करू शकत नाही. छोट्या थिएटर्समध्ये करंट बुकिंगच होत असते. ऑनलाइन तिकीट विक्री प्रणालीत प्रत्येक तिकिटामागे चार रुपये खर्च आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या थिएटरमालकांना आणखी गाळात घालण्याचाच हा प्रकार आहे. - नितीन दातार, अध्यक्ष, सिनेमा एक्झिबिटर्स ॲण्ड ओनर्स असोसिएशनशासननिर्णय अव्यवहार्यऑनलाइन तिकीट विक्री प्रणालीचा शासननिर्णय अव्यवहार्य आहे. संगणकीय तिकीट प्रणाली आम्ही यापूर्वीच कार्यान्वित केलेली आहे. ऑनलाईन प्रणालीवर मोठा खर्च येणार आहे. छोट्या थिएटर्सचालकांना या निर्णयाचा जास्त फटका बसणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी लोकमतला दिली.