शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
2
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
3
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
5
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
6
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
7
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
8
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
9
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
10
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
11
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
12
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
13
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
14
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
15
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
16
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
17
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
18
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
19
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
20
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा

प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंदर्भात निकाल राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 3:17 AM

भूषण यांच्याविरुद्धचे नऊ वर्षांपूर्वीचे आणखी एक ‘कन्टेम्प्ट’चे प्रकरणही याच खंडपीठापुढे होते. त्यात ‘कन्टेम्प्ट’ आणि नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा तौलनिक विचार करण्यासाठी खंडपीठाने काही मुद्देही नक्की केले होते

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे व एकूणच न्यायालयाच्या कारभाराविषयी गेल्या जून महिन्याच्या अखेरीस केलेल्या दोन टष्ट्वीटवरून ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’बद्दल दोषी ठरविलेले वकील प्रशांत भूषण यांना या प्रमादाबद्दल काय शिक्षा द्यायची, याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी राखून ठेवला.

भूषण यांनी आपल्या टष्ट्वीटचे समर्थन करून केवळ शिक्षा टाळ्ण्यासाठी माफी मागण्याचा अप्रामाणिकपणा करण्यास शुक्रवारी नकार दिल्यानंतर न्यायालयाने भूषण यांना त्यावर फेरविचार करण्यासाठी तीन दिवसांचा अवधी दिला होता. त्यानुसार हे प्रकरण शिक्षेवर विचार करण्यासाठी न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी आले. भूषण यांनी आपली आधीचीच भूमिका पुन्हा अधिक ठामपणे मांडली. त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील डॉ. राजीव धवन यांनी, न्यायालय भूषण यांच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने माफी घेऊ शकत नाही, असे सांगून शिक्षा ठोठावून भूषण यांना ‘हुतात्मा’ न करण्याचे आवाहन केले.

भूषण जराही बधायला तयार नाहीत तेव्हा आता काय करावे, असे विचारले असता अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी न्यायालयाने मन मोठे करावे आणि भूषण यांना शिक्षा न देता फार तर समज द्यावी, असे मत पुन्हा एकदा मांडले.

दुसरे प्रकरण खंडपीठाकडेभूषण यांच्याविरुद्धचे नऊ वर्षांपूर्वीचे आणखी एक ‘कन्टेम्प्ट’चे प्रकरणही याच खंडपीठापुढे होते. त्यात ‘कन्टेम्प्ट’ आणि नागरिकांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचा तौलनिक विचार करण्यासाठी खंडपीठाने काही मुद्देही नक्की केले होते; परंतु न्या. मिश्रा येत्या २ सप्टेंबर रोजी निवृत्त होत असल्याने ती सुनावणी करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरन्यायाधीशांनी अन्य एखाद्या सुयोग्य खंडपीठाकडे सोपवावे, असे आताच्या खंडपीठाने सांगितले. हा कन्टेम्प्ट भूषण यांनी ‘तेहलका’ नियतकालिकास दिलेल्या मुलाखतीबद्दल आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय