शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींना खासगी क्षेत्रातही आरक्षण द्या!

By admin | Updated: February 12, 2016 03:58 IST

खासगी क्षेत्रातही इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) अलीकडेच केली आहे. भाजप, काँग्रेससह

नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातही इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (एनसीबीसी) अलीकडेच केली आहे. भाजप, काँग्रेससह विविध प्रमुख पक्षांनी या शिफारशीचे स्वागत केले.व्यवसाय, रुग्णालय, शाळा, विविध प्रतिष्ठानांच्या नोकऱ्यांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यासाठी विधेयक संमत करावे, असेही या आयोगाने सुचविले आहे. खासगी क्षेत्रात ओबीसींना आरक्षण देण्याबाबत काय केले जाऊ शकते, यावर उद्योगपती आणि कंपन्यांच्या प्रमुखांशी सल्लामसलत करण्यासाठी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी दिली. या मुद्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी या समितीने वेळोवेळी बैठका घेतल्या असल्या तरी वातावरणनिर्मिती होऊ शकल्याचे दिसत नाही. अनुसूचित जाती-जमातींना खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याची शिफारस यापूर्वीच करण्यात आली असून, त्यावर दीर्घ काळापासून चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्षात परिणाम दिसलेला नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी संधी उपलब्ध असल्यामुळे ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना खासगी क्षेत्रात आरक्षण देण्यावर भर दिला जावा, असे आयोगाचे ज्येष्ठ सदस्य शकील-उझ- झमान अन्सारी यांनी स्पष्ट केले.यापूर्वीच्या सरकारांनीही रोजगारभरतीबाबत केलेल्या शिफारशींचे खासगी क्षेत्राने पालन केलेले नाही, याकडे आयोगाने लक्ष वेधले. दरम्यान, भाजप, काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

————————————-सरकारी नोकऱ्यांना ओहोटीच...गेल्या एक दशकापासून सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांना ओहोटी लागली असून त्या तुलनेत खासगी क्षेत्राने काही पट अधिक नोकऱ्या दिल्या आहेत. २००६ मध्ये शासकीय नोकरदारांची १.८२ कोटी असलेली संख्या २०१२ मध्ये १.७६ कोटींवर आली आहे. ही घट ३.३ टक्के आहे. याच काळात खासगी नोकऱ्यांमध्ये ३१.३ लाख नोकऱ्यांची भर पडली. ही वाढ ३५.७ टक्के एवढी आहे. २००६ मध्ये या क्षेत्रात असलेल्या ८७.७ लाख नोकऱ्या २०१२ मध्ये १.१९ कोटीवर गेल्या आहेत.——————————————-राजकीय पक्षांचा पाठिंबासमाजात समानता आणण्याला काँग्रेसने नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींना आरक्षण देण्यासाठी आम्ही कायदाही आणला होता. खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचा मुद्दा आमच्या निवडणूक जाहीरनाम्यातही समाविष्ट आहे, असेही ते म्हणाले.——————————-खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याचे आम्ही स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोटा पाळला जावा. मागासवर्गीयांना देणे शक्य आहे ते दिले जावे.-एस. सुधाकर रेड्डी, भाकपचे सरचिटणीस.———————————————-खासगी क्षेत्रात अनुसूचित जाती-जमातींसाठीही कोटा निश्चित करावा. आयोगाने केलेल्या शिफारशींचे आम्ही समर्थन करतो.- डी. राजा, भाकपचे राष्ट्रीय सचिव.सरकार खासगी क्षेत्रात ओबीसींना आरक्षण देण्यासाठी विधेयक आणणार असेल, तर संसदेत आणि बाहेर आमच्या पक्षाचा पाठिंबा राहील.- के.सी. त्यागी, जेडीयूचे सरचिटणीस.—————————————————-आयोगाने केलेल्या शिफारशींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे वाटचाल करावी. सार्वजनिक क्षेत्रात फार कमी संधी असल्यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण देण्याची मागणी आमचा पक्ष दीर्घ काळापासून करीत आला आहे.- एम. करुणानिधी, द्रमुकचे अध्यक्ष.---------------------------------------------------काय आहे आयोगाचा युक्तिवाद...खासगी कंपन्या आपल्या उद्योगवाढीसाठी शक्यतोवर प्रत्येक सवलतीचा लाभ घेतात. सरकारकडून असंख्य फायदेही पदरात पाडून घेतात. त्या तुलनेत अनुसूचित जाती-जमाती, तसेच ओबीसींना या क्षेत्रात प्रवेश मिळत नाही, असा युक्तिवाद आयोगाने केला आहे.