शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पाटीदारांना आरक्षण, वीज, पेट्रोल, डिझेल स्वस्त, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून स्वस्ताईचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 11:19 PM

गुजरात  विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यामधून पाटीदारांना आणि सवर्णांना ईबीसी आणि आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

अहमदाबाद - गुजरात  विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यामधून पाटीदारांना आणि सवर्णांना ईबीसी आणि आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच 49 टक्के आरक्षणाची मर्यादा बदलण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. त्याबरोबरच राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास वीज, पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात देण्याचे आश्वासही देण्यात आले आहे.  गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी जनतेच्या समाधानाचा आलेख हा जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जाहीरनाम्यामधून राज्यात अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी किमान हमीभाव देण्याचा उल्लेखही जाहीरनाम्यात आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वीज स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.  दरम्यान,  गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये दिसले आहे. या पोलममध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच आणि भाजपात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या  आज जाहीर झालेल्या फायनल ओपिनियन पोलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत अनेक नवी समीकरणे दिसून आली आहे. तसेच पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये सत्ताधारी भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजपाची मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घटून केवळ 43 टक्केच मते भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसलाही 43 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. या मतांचे जागांमध्ये रुपांतर करायचे झाल्यास भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. जागांची सरासरी काढल्यास भाजपाला 95, काँग्रेसला 82 आणि इतरांना 5 जागा मिळू शकतात. 

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujaratगुजरात