शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण : लोकसभेत विधेयक सादर 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 1:23 PM

मोदी सरकारच्यावतीने आज आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले

ठळक मुद्दे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेमध्ये गरीब सवर्णांना आरक्षण देण्याचे विधेयक सादर केलेआर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली होतीसंध्याकाळी लोकसभेमध्ये या विधेयकावर होणार चर्चा

नवी दिल्ली - आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या सवर्णांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने सोमवारी केली होती. या निर्णयाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर मोदी सरकारच्यावतीने आज हे विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी गरीब सवर्णांना देऊ केलेल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, आज दुपारी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी लोकसभेमध्ये हे विधेयक सादर केले. आता या विधेयकावर संध्याकाळी लोकसभेमध्ये चर्चा होणार आहे. दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाकडे बहुमत आणि इतर मित्र पक्षांचा पाठिंबा असल्याने हे विधेयक सहजपणे पारित होईल, अशी शक्यता आहे. मात्र राज्यसभेमध्ये भाजपाकडे बहुमत नसल्याने विधेयक पारित करताना अडचणी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे विधेयक मंजूर व्हावं, यासाठी भाजपानं खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी केला आहे. तर काँग्रेसकडूनही सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे. तसेच आप आणि बसपा या पक्षांनीही सवर्ण जातींमधील गरीबांना आरक्षण देण्याच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभा