२७ कोटी लोकांसाठी आरक्षण आंदोलन
By Admin | Updated: August 30, 2015 22:15 IST2015-08-30T22:15:27+5:302015-08-30T22:15:27+5:30
गुज्जर आणि कुर्मींसह विविध जातींच्या किमान २७ कोटी लोकांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याची आपली योजना असल्याचे

२७ कोटी लोकांसाठी आरक्षण आंदोलन
नवी दिल्ली : गुज्जर आणि कुर्मींसह विविध जातींच्या किमान २७ कोटी लोकांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्याची आपली योजना असल्याचे गुजरातमध्ये पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी जाहीर केले आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विविध जातींच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी २२ वर्षीय हार्दिक पटेल रविवारी नवी दिल्लीत आले होते. या नेत्यांसोबत बैठका घेतल्यानंतर त्यांनी प्रेस क्लब येथे पत्रपरिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, आरक्षण आंदोलन हे मॅरेथॉन आहे, केवळ १०० मीटर धावण्याची शर्यत नव्हे. आरक्षण आंदोलन व्यापक बनविण्यासाठी देशाच्या विविध भागांत विशाल रॅली आयोजित करण्याचा आपला हेतू आहे. गुजरातमध्ये जे घडले तेच आता राष्ट्रीय पातळीवरही घडले पाहिजे असे आम्हाला वाटते. जवळपास १२ राज्यांमधील लोक आमच्याशी जुळलेले आहेत.
पटेल यांनी गेल्या २५ आॅगस्ट रोजी अहमदाबाद येथे पाटीदार समाजाचा ओबीसींमध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विशाल रॅली आयोजित केली होती.