शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

आरक्षण, ४०० पार, ३ राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचं टेन्शन वाढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:00 IST

Lok Sabha Election Result 2024: निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणा आणि आरक्षण हे मुद्दे भाजपावर बुमरँग झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आता पुढच्या ६-७ महिन्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये आरक्षणासह ४०० पारचा दिलेला नारा भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. 

लोकसभा निवडणुकीमध्ये अब की बार ४०० पार असा नारा देत आपल्या अभियानाची सुरुवात करणाऱ्या भाजपाला अवघ्या २४० जागांवरच समाधान मानावे लागले. महाराष्ट्र उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यात पक्षाची मोठ्या प्रमाणावर घसरगुंडी उडाल्याने भाजपाला बहुमतासाठी तब्बल ३२ जागा कमी पडल्या. मात्र एनडीएमधील घटक पक्षांच्या मदतीने २९३ जागांपर्यंत मजल मारता आल्याने मोदींची सत्ता कायम राहिली. या निवडणुकीत ‘अब की बार ४०० पार’ ही घोषणा आणि आरक्षण हे मुद्दे भाजपावर बुमरँग झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, आता पुढच्या ६-७ महिन्यांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तसेच या निवडणुकांमध्ये आरक्षणासह ४०० पारचा दिलेला नारा भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत नुकतंच एक मोठं विधान केलं आहे. ४०० पार या नाऱ्यामुळे मतदारांमध्ये  भीतीचं वातावरण निर्माण झालं. ४०० जागामिळाल्यास घटनेमध्ये बदल केला जाईल आणि आरक्षण रद्द करण्यात येईल, अशी भीती विरोधकांनी मतदारांच्या मनात निर्माण केली, असा दावा शिंदे यांनी केला. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ६३ जागांचं नुकसान सहन करावं लागलं. तसेच भाजपाचा आकडा हा २४० जागांवर येऊन अडकला. त्यामुळे लोकसभेतील सगळी समिकरणंच बदलून गेली आहेत. आता महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या नाऱ्यामुळे नुकसान तर होणार नाही, याची चिंता भाजपामध्ये व्यक्त केली जात आहे.  

४०० पार आणि आरक्षणावरून विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी आरक्षित असलेल्या जागांवर भाजपाला मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोकसभेतील ५४३ जागांपैकी ७९ जागा ह्या अनुसूचित जातींसाठी तर ४७ जागा ह्या अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.  यापैकी अनेक जागांवर भाजपाला नुकसानीचा सामना करावा लागला. मागय्या निवडणुकीत भाजपाला ३३ टक्के दलित आणि ४२ टक्के ओबीसींची मतं मिळाली होती. मात्र यावेळी त्या प्रमाणात घट झाली. या मुद्द्यांमुळे भाजपाला उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. उत्तर प्रदेशातील एससींसाठी आरक्षित १७ जागांपैकी केवळ ८ जागांवर भाजपाला विजय मिळाला. तर ९ जागा ह्या इंडिया आघाडीच्या खात्यात गेल्या. २०१९ मध्ये यापैकी १४ जागा ह्या भाजपाकडे होत्या. 

दरम्यान, अनुसूचित जमातींसाठी आरक्षित असलेल्या ४७ जागांपैकी २५ जागांवर भाजपाचा विजय झाला तर काँग्रेसने १२ जागा जिंकल्या. येथेही भाजपाला नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे आता आरक्षण आणि ४०० पार हे मुद्दे विधानसभा निवडणुकीत पुन्हा पुढे आल्यास मोठं नुकसान होऊ शकतं अशी भीती भाजपाला वाटत आहे. याचं आणखी एक कारण म्हणजे मागच्या वेळी महाराष्ट्रात २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला केवळ ९ जागांवर विजय  मिळालाय. तर झारखंडमध्येही पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. अशा परिस्थिती २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमधील यशाची पुनरावृत्ती करणे भाजपासाठी आव्हानात्मक दिसत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान, माजी खासदार अनंत कुमार हेडगे यांच्यासह भाजपाच्या काही नेत्यांनी राज्यघटनेतील बदलावरून काही विधानं केली होती. नंतर विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला होता. त्यामुळे अनेत मतदारसंघात भाजपाची पीछेहाट झाली होती. 

महाराष्ट्राप्रमाणेच झारखंडमध्येही भाजपासमोर मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे. येथे अनुसूचित आरक्षित असलेल्या सर्व ५ जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या येथील माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे तुरुंगात आहेत. ही बाबही भाजपाच्या विरोधात जाऊ शकते.  

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रJharkhandझारखंडHaryanaहरयाणा