शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

Republic Day 2018 : गरुड कमांडो जेपी निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र, पुरस्कार प्रदान करताना राष्ट्रपतींना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 17:56 IST

राजधानी नवी दिल्लीत शुक्रवारी राजपथवर देशाची संस्कृती आणि शौर्याच्या प्रदर्शनादरम्यान एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला.

नवी दिल्ली -  राजधानी नवी दिल्लीत 69 व्या प्रजासत्ताक दिनी शुक्रवारी राजपथवर देशाची संस्कृती आणि शौर्याच्या प्रदर्शनादरम्यान एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. यावेळी उपस्थित जनतेसहीत राष्ट्रपती रामनाथ कोविंददेखील भावुक झाले होते. भारतीय वायू सेनेचे (आयएएफ) गरुड कमांडो ज्योती प्रकाश निराला यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. अशोक चक्र हा शांततेच्या काळात दिला जाणारा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.  निराला जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत लढताना शहीद झाले होते. 

यावेळी राजपथवर जेव्हा शहीद निराला यांची शौर्यगाथा सांगण्यात आली, त्यावेळी परेड पाहण्यासाठी आलेली जनतादेखील भावुक झाली. 69 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान निराला यांची पत्नी यांना हा सन्मान देण्यात आला. भारतीय वायू सेनेच्या विशेष दलाचे कमांडोंनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत दोन हात करताना धैर्य व शौर्य दाखवत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. निराला हे 18 नोव्हेंबर 2017 रोजी बांदीपोरा जिल्ह्यातील चंदरनगर गावातील गरुड कमांडोची तुकडी व राष्ट्रीय रायफलद्वारा संयुक्तरित्या राबवण्यात आलेल्या आक्रमक अभियानाचा एक भाग होते. 

यावेळी गावातील एका घरामध्ये दहशतवादी लपले होते. गरुड कमांडोंच्या तुकडीनं या घराला चारही बाजूंनी घेरले होते. दहशतवाद्यांना पसार होण्यास यश मिळू नये, यासाठी ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते, त्याठिकाणी निराला स्वतः तळ ठोकून होते. सैन्याची तुकडी दहशतवादी बाहेर पडण्याची वाट पाहत असताना यावेळी एकूण 6 दहशतवादी अंदाधुंद गोळीबार करत त्यांच्या दिशेनं पळत आले.  यावेळी निराला यांनी लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आणि एकाला जखमी केले. चकमकीदरम्यान निरालादेखील जखमी झाले होते. गंभीर स्वरुपात जखमी झालेले असतानाही निराला यांनी दहशतवाद्यांविरोधातील कारवाई एका क्षणासाठीही थांबवली नाही. यावेळी सर्वच्या सर्व सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.  एकट्या निराला यांनीच तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. 

टॅग्स :Republic Day 2018प्रजासत्ताक दिन २०१८Ramnath Kovindरामनाथ कोविंदindian air forceभारतीय हवाई दल