शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 5:37 AM

मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी पीएफआय आणि रिहॅबच्या सात पदाधिकाºयांना ईडीने समन्स जारी केले होते.

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेऊन ईडीसमक्ष पदाधिकाऱ्यांना हजर होण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे.केरळस्थित पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनच्या (आरआयएफ) कायदा प्रतिनिधींनीसमवेत चार अधिकाºयांनी सकाळी साडेदहा वाजता ईडीच्या अधिकाºयांची भेट घेतली. मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी पीएफआय आणि रिहॅबच्या सात पदाधिकाºयांना ईडीने समन्स जारी केले होते. त्यांना बुधवारी हजर होण्यास सांगण्यात आले होते.पीएफआयचे अनिस अहमद यांनी सांगितले की, अध्यक्ष अबुबकर यांच्यासाठी आणखी मुदत मागण्यात आली आहे. त्यांना कर्करोग असून, आंतड्यांचाही त्रास आहे. ते मागील काही महिन्यांपासून इस्पितळात आहेत. आम्ही ईडीच्या कारवाईबाबत सर्व कायदेशीर पर्यायांवर विचार करणार आहोत. आमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असून, आयकर विवरणही सादर केलेले आहे. हा प्रकार सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिहॅबकडूनही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु फोन आणि ई-मेलला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.ईडीच्या अधिकाºयांनी सांगितले की, अबुबकर यांच्या हजेरीची नवीन तारीख दिली जाऊ शकते. अन्य पदाधिकाºयांना पुढच्या आठवड्यात ईडीसमक्ष हजर व्हायचे आहे.आरआयएफच्या नऊ बँक खात्यांतून काढण्यात आलेली रक्कम आणि दुबईतील खात्यांत २० लाख रुपये जमा असल्याप्रकरणीही ईडी चौकशी करीत आहे. पीएफआय, आरएफआय आणि इतर बँक खात्यांत वेगवेगळ्या वेळी एकूण १२० कोटी रुपये जमा करण्यात आले असून, हा व्यवहारही ईडीच्या चौकशीच्या घेºयात आहे.निदर्शनांसाठी पैसानागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागांत घडलेल्या हिंसक निदर्शनांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमागे पीएफआय असल्याप्रकरणी ईडी अधिक चौकशी करीत आहे.समन्स जारी करण्यात आलेल्या या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांत ई. अबुबक, ओ. एम. अब्दुल सलाम, एम. मोहम्मद अली जीना, अनिस अहमद आणि अब्दुल वाहीद सैत, रमीज मुहम्मद व एच. चंद्रकांदी यांचा समावेश आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय