पोर्नोग्राफी, हिंसक संदेश पाठविणाऱ्यांची माहिती द्या; व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारचा दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 00:57 IST2019-02-15T00:56:53+5:302019-02-15T00:57:03+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे.

Report pornography, senders of violent message; The Central Government's pressure on Whatteapp | पोर्नोग्राफी, हिंसक संदेश पाठविणाऱ्यांची माहिती द्या; व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारचा दबाव

पोर्नोग्राफी, हिंसक संदेश पाठविणाऱ्यांची माहिती द्या; व्हॉट्सअ‍ॅपवर केंद्र सरकारचा दबाव

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर पोर्नोग्राफी व हिंसेला उत्तेजन देणारे संदेश पाठविणा-या मूळ व्यक्तींची माहिती मिळावी यासाठी मोदी सरकार या समाजमाध्यमावर सातत्याने दबाव आणत आहे. मात्र अशी माहिती दिल्याने व्यक्तीच्या खासगीपणावर गदा येईल असा प्रतिवाद व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे.
या दडपणामुळे व्हॉट्सअ‍ॅप भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता नाही. या कंपनीचे प्रवक्ते कार्ल वुग म्हणाले की, एखादा संदेश पाठविलेल्या मूळ व्यक्तीची व तो संदेश कोणाला पाठविला गेला याची माहिती आम्ही देणे शक्य नाही. खासगीपणाच्या हक्कावर त्यामुळे गदा येईल. बालकांच्या लैंगिक शोषणाबद्दलच्या संदेशांवर व्हॉट्सअ‍ॅपने बंदी आणली आहे. तसे संदेश पाठविणारी अडीच लाख खाती बंद केली आहेत.
इलेक्ट्रॉनिक माहिती-तंत्रज्ञान खात्यातील अधिकाºयाने सांगितले की, समाजमाध्यमांवर समाजासाठी विघातक असलेले संदेश पाठविणाºया मूळ व्यक्तीचे नाव कळणार नसेल तर ते अयोग्य आहे. अशामुळे वाईट प्रवृत्तींना या व्यासपीठांवर राजरोस संरक्षणच मिळेल.

Web Title: Report pornography, senders of violent message; The Central Government's pressure on Whatteapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.