शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

संसदीय समित्यांचे अहवाल हा वैध पुरावा, सुप्रीम कोर्टाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 01:24 IST

न्यायालयात उपस्थित झालेल्या एखाद्या मुद्द्याचे आकलन व्हावे यासाठी इतर गोष्टींबरोबर संसदीय समित्यांच्या अहवालांचा पक्षकारांनी आधार घेण्यात काहीच गैर नाही. अशा अहवालांचा न्यायालयीन कामात उपयोग करण्याने संसदेचा हक्कभंग होत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी दिला.

नवी दिल्ली - न्यायालयात उपस्थित झालेल्या एखाद्या मुद्द्याचे आकलन व्हावे यासाठी इतर गोष्टींबरोबर संसदीय समित्यांच्या अहवालांचा पक्षकारांनी आधार घेण्यात काहीच गैर नाही. अशा अहवालांचा न्यायालयीन कामात उपयोग करण्याने संसदेचा हक्कभंग होत नाही, असा निकालसर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी दिला.स्कर्व्हायकल कर्करोगावरील लशीच्या काही औषध कंपन्यांनी घेतलेल्या चाचण्यांनी रुग्णांवर दिसून आलेल्या दुष्परिणामांबाबत सामाजिक कार्यकर्त्या कल्पना मेहता यांनी केलेल्या जनहित याचिकेत मुद्द्याला बळकटी देण्यासाठी ज्येष्ठ वकील कॉलिन गोन्साल्विस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संलग्न संसदीय समितीच्या ८१ व्या अहवालाचा आधार घेतला होता. औषध कंपन्यांनी यास आक्षेप घेतला व त्यातून संसदीय समित्यांचे अहवाल न्यायालयीन कामकाजात पूर्णपणे निषिद्ध मानावेत का, असा मुद्दा उपस्थित झाला.सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण, न्या. अजय खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने यावरील राखून ठेवलेला निकाल जाहीर केला. सरन्यायाधीश व न्या. खानविलकर यांनी एक व अन्य तीन न्यायाधीशांनी स्वतंत्र, पण सहमतीची निकालपत्रे दिली.न्यायालयाने प्रमुख निष्कर्ष- हेअहवाल सार्वजनिक दस्तावेज आहेत.- ‘इव्हिडन्स अ‍ॅक्ट’नुसार ते न्यायालयीन कामकाजात वैध पुरावे ठरतात.- अशा अहवालांचा न्यायालयीन कामात वापर केल्याने शासनव्यवस्थेच्या तीन अंगांमधील संतुलनास बाधा येत नाही.- या अहवालांची चिकित्सा होऊ शकते.- अशा अहवालांना न्यायालयीन कामांत मज्जाव करणे हे एकाधिकारशाहीला प्रोत्साहन ठरेल.- न्यायालयीन कामाच्या नावाखाली अशा अहवालांच्या सत्यतेविषयी शंका घेतली जाऊ शकत नाही. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयnewsबातम्या