शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीणीच्या हत्येची पुनरावृत्ती! कोल्ह्याला दिली स्फोटकं खायला अन् घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 15:24 IST

ही अमानुष आणि निर्दयी घटना ताजी असताना स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविभागाने अटक केली आहे.

ठळक मुद्देवन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मांसाच्या आत देशी बनावटी बॉम्ब (स्फोटकं) भरून कोल्ह्याला खाण्यास दिले. त्यानंतर देशी बनावटी बॉम्ब कोल्ह्याच्या तोंडात फुटल्याने कोल्ह्याच्या मृत्यू झाला.ही घटना उघडकीस येताच पोलिसांना एका पोत्यात जनावराच्या मृतदेहासह स्टॉलवर चहा पिताना काही लोकांचा समूह आढळून आला.

तिरुची - नुकतीच केरळ येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असताना आता एका भयानक घटना सोमवारी तिरुचि येथील जीयापुरमजवळ घडली आहे. केरळ येथे गरोदर हत्तीणीचा अननसातून फटाके देऊन जीव घेतला. ही अमानुष आणि निर्दयी घटना ताजी असताना स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविभागाने अटक केली आहे. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मांसाच्या आत देशी बनावटी बॉम्ब (स्फोटकं) भरून कोल्ह्याला खाण्यास दिले. त्यानंतर देशी बनावटी बॉम्ब कोल्ह्याच्या तोंडात फुटल्याने कोल्ह्याच्या मृत्यू झाला.केरळमध्ये स्फोटकांचा वापर करून गरोदर हत्तीणीच्या हत्येचा आक्रोश अद्याप संपलेला नाही. देशभरात या घटनेमुळे संतापाची लाट उसळलेली असताना तिरुची येथे पुन्हा तशीच घटना उघडकीस आली आहे, ज्यात नरिकुरवारांच्या गटाने मांसामध्ये स्फोटके भरुन एका कोल्ह्याची हत्या केली. काही उपद्रवी लोकांचा गट गावात मधाच्या शोधात गेला होता. परत येताना त्यांना एक कोल्हा सभोवताली फिरताना दिसला. म्हणून त्याची शिकार कारण्यासाठी आरोपींनी देशी बनावटी बॉम्बचा वापर केला आणि बॉम्ब तोंडात फुटल्याने जबडा रक्तबंबाळ झाला," अशी माहिती एका वनअधिकाऱ्याने दिली. 

ही घटना उघडकीस येताच पोलिसांना एका पोत्यात जनावराच्या मृतदेहासह स्टॉलवर चहा पिताना काही लोकांचा समूह आढळून आला. "जीयापुरम पोलीस ठाण्यातील एका पोलीस कॉन्स्टेबलने एका चहाच्या स्टॉलवरील नरिकुरवारांचा समूहाच शोध घेतला. त्यांची संशयास्पद वागणूक पाहून त्याने त्यांच्याकडे चौकशी केली. प्राथमिक चौकशीत पोलिसांना आढळले की, त्यांनी कोल्ह्याची शिकार केली. नंतर माहिती पुढे आमच्याकडे देण्यात  आली, अशी माहित वन अधिकारी यांनी दिली.अटक केलेल्या 12 जणांमध्ये रामराज (21), सारावनन (25), येसुदास (34), सारथकुमार (28), देवदास (41), पांडियन (31), विजयकुमार (38), सत्यमूर्ती (36), सारथकुमार (26), राजामणिकम (70) राजू (45) पातमपल्ली (78) हे असून  सर्व आरोपी तिरुवेरंबूर जवळील पुलानकुडी कॉलनी येथे राहणारे आहेत. आरोपींच्या अटकेनंतर वन अधिकाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील देशी बनावटीचे बॉम्ब हस्तगत केले आणि ते बॉम्ब कशासाठी आणले  होते, या संदर्भात अधिक तपास केला जात आहे. 

 

मन विषण्ण करणारी घटना; पाण्याच्या टाकीत 13 माकडं मृतावस्थेत, विषप्रयोगाचा संशय

 

खळबळजनक! ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंड करत होता एक्स गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडीओ व्हायरल 

 

हृदयद्रावक! अन्नाच्या शोधात मानवी वसाहतीनजीक गेला हत्ती; वीजेच्या तारांनी घेतला जीव

 

निर्दयतेचा कळस : केरळमधील हत्तीणीसारखीच घटना हिमाचलमध्ये; गाईला खायला दिली स्फोटकं

टॅग्स :Deathमृत्यूTamilnaduतामिळनाडूforest departmentवनविभागArrestअटकPoliceपोलिस