बेळगाव, हुबळी विमानतळांच्या नामांतराचा घाट; कुमारस्वामींचे सुरेश प्रभू यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 18:57 IST2018-12-22T18:56:40+5:302018-12-22T18:57:28+5:30

कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात आला.

Rename the Airports of Belgaum, Hubbli; kumarswamy's letter to Suresh Prabhu | बेळगाव, हुबळी विमानतळांच्या नामांतराचा घाट; कुमारस्वामींचे सुरेश प्रभू यांना पत्र

बेळगाव, हुबळी विमानतळांच्या नामांतराचा घाट; कुमारस्वामींचे सुरेश प्रभू यांना पत्र

बेंगळुरु : उत्तर प्रधेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करण्यात येणाऱ्या नामांतरावरून देशात टीका होत असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही नामांतराचा घाट घातला आहे. बेळगाव आणि हुबळीच्या विमानतळांची नावे बदलण्याचे पत्र त्यांनी नागरी विमानोड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी लिहिले आहे. 


कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात आला. यावेळी राज्यपाल विजुभाई वाला यांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगाव आणि हुबळीच्या विमानतळांची नावे बदलण्यासाठी नागरी विमानोड्डाण मंत्री यांना पत्र लिहिल्याचे सांगितले. 




बेळगावच्या विमानतळाचे नाव कित्तूर राणी चन्नम्मा विमानतळ आणि हुबळीच्या विमानतळाचे नाव संगोळ्ळी रायण्णा विमानतळ करण्याची मागणी केली आहे. 




 

Web Title: Rename the Airports of Belgaum, Hubbli; kumarswamy's letter to Suresh Prabhu