Remnants of a plane discovered 3 years ago | ५१ वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे सापडले अवशेष
५१ वर्षांपूर्वी कोसळलेल्या विमानाचे सापडले अवशेष

चंदीगड : हिमाचल प्रदेशच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये ५१ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या भारतीय हवाई दलाच्या एएन-३२ मालवाहू विमानाचे अवशेष लष्कराच्या डोग्रा स्काऊट््स तुकडीने यशस्वीपणे शोधून काढले आहेत. त्या विमानातील सर्व १०२ व्यक्ती ठार झाल्या होत्या.
हे विमान ७ फेब्रुवारी १९६८ रोजी चंदिगढला परत येत असता रोहतांग खिंडीजवळ बेपत्ता झाले होते. विमानात लष्कराच्या ९० जवानांसह इतर लोक होते. लष्कराच्या पश्चिम कमांडने या विमानाचे व मृतांचे अवशेष शोधण्यासाठी २६ जुलै रोजी मोहीम हाती घेतली होती.
पश्चिम कमांडने रविवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले की, सलग १३ दिवस अथक शोध घेतल्यानंतर ५,२४० मीटर उंचीवर ढाका हिमनदीच्या क्षेत्रात एअरो इंजिन, वायरी, इलेक्ट्रिक सर्किट््स, पंखे, इंधन टाकीचे भाग, ब्रेकची यंत्रणा व कॉकपिटचा दरवाजा असे विमानाचे अवशेष शोधून काढण्यात आले. याखेरीज विमानातील जवानांच्या काही व्यक्तिगत वस्तूही सापडल्या.
भविष्यात संदर्भांसाठी उपयोगी पडावेत यासाठी शोध घेतलेल्या व वस्तू मिलालेल्या जागांचे नेमके नकाशे तयार करण्यात आले आहेत. पायी गेलेल्या डोग्रा स्काऊट््सच्या शोध तुकडीला मदत करण्यासाठी हवाई दलही ६ आॅगस्टपासून सोध मोहिमेत सामिल झाले होते.
ज्या भागात हे विमान कोसळले होते तेथे कित्येक वर्षांच्या हिमस्खलनाने बर्फाचे मोठे थर साजलेले होते व आताही तेथे सतत बर्फाच्या दरडी कोसळत असतात. शिवाय पातळ बर्फाच्या थराने झाकलेल्या फसव्या आणि घातक दऱ्याही बºयाच असल्याने त्या ठिकाणी पोहोचणे हेच मोठे खडतर काम होते. (वृत्तसंस्था)

कुटुंबियांच्या आशा पल्लवित
- हे विमान अचानक बेपत्ता झाले तेव्हा ते नाईलाजाने शत्रूच्या प्रदेशात उतरले असावे व त्यातील सर्वांना कैद केले गेले असावे, असा समज निर्माण झालो होता.
परंतु सन २००३ मध्ये गिर्यारोहकांच्या एका हिमनदीपाशी त्या विमानातील एका जवानाचे ओळखपत्र योगायोगाने सापडले आणि विमान गायब होण्याच्या रहस्याचा उलगडा झाला.

- आपल्या स्वजनांची निदान पार्थिवे तरी अंत्यसंस्कारांसाठी मिळतील, अशा कुटुंबियांच्या आशा पल्लवित झाल्या. त्यानंतर अपघातातील मृतदेह परत आणण्यासाठी अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. पण आत्तापर्यंत फक्त पाच मृतदेह मिळू शकले अहेत.

Web Title: Remnants of a plane discovered 3 years ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.