शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

राजपथावर जागवणार लोकमान्यांच्या स्मृती

By admin | Updated: January 24, 2017 00:59 IST

यंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे बहुआयामी

सुरेश भटेवरा / नवी दिल्लीयंदाच्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या राजपथावरील संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणारा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे.लोकमान्यांच्या १६0व्या जयंती वर्षानिमित्त स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान, पारतंत्र्यात ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांनी चालवलेली सामाजिक जागृती, शिवजयंती व गणेशोत्सव सुरू करून महाराष्ट्रातील जनतेसह भारतीयांना सांस्कृतिक व्यासपीठांवर संघटित करण्यासाठी टिळकांनी हाती घेतलेली मोहीम, ब्रिटिश सरकारने टिळकांविरुद्ध चालवलेले खटले, शिक्षण व व्यायामाला टिळकांनी दिलेले विशेष प्रोत्साहन या बाबींचा चित्ररथात समावेश आहे.चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फूट उंचीचा भव्य पुतळा असून, पुतळ्यामागे टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’च्या छपाईसाठी १९१९ साली लंडनहून मागवलेल्या डबल फिल्टर प्रिंटिंग मशिनवर छपाई होत असलेले वृत्तपत्र दर्शवण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरत्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज व श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर मुंबई हायकोर्टात टिळकांविरुद्ध चाललेला खटला व मंडालेच्या तुरुंगातील त्यांंचा कारावास दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात व्यायामाला व शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या टिळकांच्या स्मृती जागवण्यासाठी मल्लखांब व कुस्ती खेळणारी मुले तसेच बाकावर बसलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लाइव्ह प्रदर्शन आहे.चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४0 कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरणच्या रूद्राक्ष ग्रुपच्या २८ कलाकारांचे पथक राजपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना ‘पहिलं नमन हो करितो वंदन, ऐका तुम्ही हो गुणीजन करितो कथन’ या गीतावर नृत्य सादर करणार आहे. मुंबईतल्या दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे ३ क्रीडापटू चित्ररथावर मल्लखांब व कुस्तीची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.