महिलेच्या गळ्यातील चैन ओढली

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:16+5:302014-12-12T23:49:16+5:30

बिलोली : नरसीहून बिलोलीकडे येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन तोडून चोरी केल्याची घटना नरसी बसस्थानकात घडली़ गळ्यातील ऐवज लंपास झाल्याचे कळताच घाबरलेल्या महिलेने दुसर्‍या दिवशी पोलिसात तक्रार दिली़

Relieve the woman's throat | महिलेच्या गळ्यातील चैन ओढली

महिलेच्या गळ्यातील चैन ओढली

लोली : नरसीहून बिलोलीकडे येणार्‍या एसटी महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन तोडून चोरी केल्याची घटना नरसी बसस्थानकात घडली़ गळ्यातील ऐवज लंपास झाल्याचे कळताच घाबरलेल्या महिलेने दुसर्‍या दिवशी पोलिसात तक्रार दिली़
गांधीनगर येथील नागाबाई फुलारी (वय ७०) या कामनिमित्त नांदेडला गेल्या होत्या़ परतीच्या प्रवासात नरसीपर्यंत अल्यानंतर पंढरपूर-निजामाबाद या बसमध्ये त्या चढल्या़ चढत असताना मागून कोणीतरी धक्का दिल्याचे लक्षात आले़ पण गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैनग ेल्याचे बस निघाल्यावर कळाले़ बिलोलीत परतल्यानंतर बिलोली व रामतीर्थ पोलिसांशी संपर्क केला़ पोलिसांनी नरसी बसस्थानकात चौकशी सुरू केली़ पण अज्ञात चोरट्यांचा शोध लागला नाही़ दीड तोळा चैनची किंमत जवळपास ४० हजार आहे़ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा नोंदलवा़ मागच्या काही दिवसापासून नरसी, बिलोली बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत़ तर बिलोलीच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीचा प्रकार सातत्याने होत आहे़ दर आठवड्याला बाजारात ४ ते ५ जणांचे मोबाईल चोरी होत आहेत़ याबाबत बिलोली पोलिसात सतत तक्रारी येत आहेत़

Web Title: Relieve the woman's throat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.