शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गुजरातमध्ये रिलायन्स उभारणार जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय

By मोरेश्वर येरम | Updated: December 20, 2020 13:19 IST

रिलायन्सच्या रिफायनरी प्रकल्पाजवळच्या २८० एकर जागेवर हे भव्य प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे.

अहमदाबादगुजरातच्या जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड भव्य प्राणीसंग्रहालय उभारणार असल्याची माहिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे, हे प्राणीसंग्रहालय जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय ठरणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

प्राणीसंग्रहालयात भारत आणि जगातील १०० हून अधिक विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी असणार आहेत. जामनगरच्या मोती खवडी येथील रिलायन्सच्या रिफायनरी प्रकल्पाजवळच्या २८० एकर जागेवर हे भव्य प्राणीसंग्रहालय उभारलं जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे.

रिलायन्सचा याच परिसरात जगातील सर्वात मोठा तेल रिफायनरी प्रोजेक्ट आहे. यात पेट्रोकेमिकल्स प्रकल्पाचाही समावेश आहे. याच प्रकल्पाच्या जवळच जगातील सर्वात मोठं प्राणीसंग्रहालय तयार केलं जाणार  आहे. 

प्राणीसंग्रहलयाचं काम कोविड-१९ मुळे रखडलं होतं. पण ते पुढील दोन वर्षात पूर्ण होण्याची ग्वाही, कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. "प्राणी संग्रहालयाला 'ग्रीन झूलॉजिकल, रेस्क्यू आणि रिहॅबिल्टेशन किंडम' असं नाव देण्यात येणार आहे. प्राणी संग्रहालयासाठीच्या सर्व परवानग्या केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळाल्या आहेत.", असं कंपनीचे संचालक (कॉर्पोरेट व्यवहार) परिमल नथवाणी यांनी सांगितलं. 

प्राणी संग्रहालयात 'फॉरेस्ट ऑफ इंडिया', 'फ्रॉग हाउस', 'इनसेक्ट लाइफ', 'ड्रॅगन्स लँड', 'एग्झॉटीक आयसलँड', 'वाइल्ड ट्रेल ऑफ गुजरात' आणि 'अॅक्वाटीक किंडम', असे विविध प्रभाग असणार आहेत. 

हरणं, लॉरिस, अस्वल, फिशिंग कॅट, कोमोडा ड्रॅगन्स, लांडगे आणि गुलाबी बगळे हे विशेष आकर्षण असणार आहे. यासोबतच आफ्रिकन सिंह देखील पाहायला मिळणार आहेत. १२ शहामृग, १० मगर, २० जिराफ, १८ आफ्रिकन मीरकॅट, ७ बिबटे, आफ्रिकन हत्ती असणार आहेत.  

टॅग्स :Relianceरिलायन्सwildlifeवन्यजीवGujaratगुजरात