स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार

By Admin | Updated: November 13, 2014 10:41 IST2014-11-13T10:41:04+5:302014-11-13T10:41:04+5:30

अभिनेता शाहरुख खान याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी हातात झाडू घ्यायला नकार दिला आहे.

Rejecting a broom in the hands of Shah Rukh for Swachh Bharat campaign | स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार

स्वच्छ भारत अभियानासाठी शाहरुखचा हातात झाडू घ्यायला नकार

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १२ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाला सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अभिनेता शाहरुख खान याने मोदींच्या या अभियानासाठी हातात झाडू घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मोदींच्या या अभियानाला पाठिंबा दर्शवत यामुळे जनतेमध्ये स्वच्छतेचा संदेश पोहोचत असल्याचे शाहरुखने म्हटले आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत अभियान ही मोहीम सुरु केली आहे.  या मोहीमेत शाहरुखही हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरणार का असा सवाल शाहरुखला विचारण्यात आला. यावर शाहरुख म्हणतो, मला हातात झाडू घ्यायला आवडत नाही. पंतप्रधान आणि अन्य सेलिब्रिटींनी ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. सेलिब्रिटींनी या मोहीमेत सहभाग घेतल्याने जनतेमध्ये जनजागृती होते व यापुढे कचरा फेकताना ते विचार करतील, हेच या मोहीमेचे उद्देश असल्याचे शाहरुखने सांगितले.  टेनिसपटू सानिया मिर्झाने शाहरुख खानला स्वच्छ भारत मोहीमेसाठी नॉमिनेट केले होते.

Web Title: Rejecting a broom in the hands of Shah Rukh for Swachh Bharat campaign