शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

‘यूपीए’ची धुरा लवकरच पवार यांच्या खांद्यावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 07:06 IST

Sharad Pawar : केंद्र सरकारने सुधारणा केलेले शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष होणार, या चर्चेला उधाण आले आहे.

-  विकास झाडे  नवी दिल्ली : केंद्र सरकारने सुधारणा केलेले शेतीविषयक कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्ष होणार, या चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसच्या गोटातून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नसला तरी यूपीएच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांचे स्वास्थ्य लक्षात घेता पवार यांच्याच  गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. शरद पवार शनिवारी, १२ डिसेंबर रोजी वयाची ८० वर्षे पूर्ण करीत आहेत. यूपीएमधील सर्वात दमदार नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. घटक पक्षातील सर्वच नेत्यांशी पवारांचे उत्तम संबंध आहेत.  सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा असल्या तरी त्यांच्या प्रकृतीमुळे नवा पर्याय शोधण्यावर गेले काही दिवस यूपीएमध्ये मंथन सुरू आहे. पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष असला तरी देशातील प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याची क्षमता त्यांच्यात आहे. तिसरी आघाडी तयार न होऊ देता ‘एनडीए’ सरकारच्या विरोधात सक्षमपणे उभे राहण्याचे कौशल्य शरद पवार यांच्यातच आहे. त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे.देशात राबविणार ‘महाराष्ट्र मॉडेल’महाराष्ट्रात शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचा यशस्वी पॅटर्न राबविण्याचे श्रेय पवार यांनाच जाते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद, देशाचे संरक्षणमंत्रिपद आणि सलग दहा वर्षे केंद्रीय कृषिमंत्रिपद पवार यांनी सांभाळले आहे. सध्या शेतीविषयक कायद्यांवरून देशभरात सरकारविरोधी वातावरण आहे. विरोधी पक्षांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी यूपीएतर्फे राष्ट्रपतींची भेट घेतली. पवारांनी महाराष्ट्रात केलेला प्रयोग देशभरात राबविला जाऊ शकतो, अशी चर्चाही यूपीएच्या घटक पक्षांमध्ये सुरू आहे. यूपीएमधील घटक पक्षांशी सलोख्याचे संबंध असलेल्या शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब  करताना कॉँग्रेसमधूनच विरोध होऊ शकतो. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षपदी राहू इच्छित नसतील तर काँग्रेसच्या अन्य नेत्यावर ही जबाबदारी सोपविली जाईल असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. 

यामागे ‘लेटरबॉम्ब’ नेतेयूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती केली जाईल, हे वृत्त पसरविण्यामागे काँग्रेसचा ‘लेटरबॉम्ब’ गट असल्याचे एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उभे करीत काँग्रेसच्या दोन डझन नेत्यांची पत्र लिहिले होते.  राष्ट्रवादीकडून मात्र इन्कारशरद पवार यूपीएचे अध्यक्ष होतील, या वृत्ताचा राष्ट्रवादीकडून इन्कार करण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनावरून लोकांचे लक्ष भरकटावे, यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. यूपीएच्या घटकपक्षांशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यूपीएचे अध्यक्षपद कसे स्वीकारतील, असा सवाल करत हे निराधार वृत्त असल्याचे या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण