शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination:मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन; याशिवाय मिळणार नाही लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 14:39 IST

Corona Virus Vaccination Registration: मुलांना भारत बायोटेकची कोवॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस दिली जाऊ शकते.

नवी दिल्ली: 3 जानेवारी 2022 पासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळाच्या दिवशी याबाबत घोषणा केली होती. यासाठी आता 1 जानेवारीपासून CoWIN अॅपवर नोंदणी सुरू होणार आहे. यासाठी मुले त्यांचे कोणतेही एक ओळखपत्र वापरुन रजिस्ट्रेशन करू शकतील. एएनआय या वृत्तसंस्थेने CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आरएस शर्मा यांच्या हवाल्याने ही माहिती दिली. 

पंतप्रधानांची घोषणापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हणजेच 25 डिसेंबरला घोषणा केली होती की, 3 जानेवारीपासून देशातील 15-18 वयोगटातील मुलांना कोरोना विरोधातील लस दिली जाईल. याशिवाय, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन वर्करला बूस्टर डोस आणि 60 वर्षांवरील आजारी व्यक्तींना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बूस्टर डोस दिला जाईल. 

रजिस्ट्रेशची प्रोसेस

  • सर्वा आधी Covin App वर जा. तुमचा मोबाईल क्रमांक टाका. ओटीपी येईल, तो टाकून लॉग इन करा.
  • आता तुमचा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
  • तुम्ही निवडलेल्या आयडीचा नंबर, नाव टाका. त्यानंतर लिंग आणि जन्मतारीख निवडा.
  • मेंबर अॅड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
  • आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा. केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्या.
  • लसीकरण केंद्रावर, तुम्हाला आयडी आणि कोड द्यावा लागेल, हा तुम्हाला नोंदणी केल्यावर मिळतो.

देशात सुमारे 10 कोटी मुले 15 ते 18 वयोगटातील

अधिकृत आकडेवारीनुसार, देशात 15-18 वयोगटातील सुमारे 10 कोटी मुले आहेत. या बालकांना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. लहान मुलांसाठी लसीची मागणी देशात खूप दिवसांपासून केली जात होती. सध्या जगभरातील 30 हून अधिक देशात मुलांना कोरोनाची लस देत आहेत. क्युबामध्ये 2 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लसीकरण केले जात आहे, तर दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि फिलीपिन्समध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना लस दिली जात आहे.

कोणती लस मिळेल ?पंतप्रधानांच्या घोषणेनंतर देशपातळीवर लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतातील मुलांना भारत बायोटेकचे कोवॅक्सिन किंवा झायडस कॅडिलाचे ZyCoV-D, यापैकी एक डोस दिला जाऊ शकतो. या दोन्ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

या लसींना लवकरच मिळू शकते परवानगीतिसरी संभाव्य लस सीरम इन्स्टिट्यूटची नोव्हावॅक्स आहे. याला राष्ट्रीय औषध नियंत्रकाने 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी चाचणी करण्यास मान्यता दिली आहे. तर, चौथी बायोलॉजिकल E's Corbevax आहे, ज्याला पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांवर चाचण्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. Novavax आणि Corbevax ला अद्याप लसीकरणासाठी मंजूरी मिळालेली नाही. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या