शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अब की बार, प्रादेशिक पक्षांवर मदार; 'हे' पक्ष किंगमेकर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2019 10:03 IST

लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्ष बजावणार महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी राजकीय धुळवूड रंगात आली आहे. सत्तेचे रंग नेमके कोणाच्या नशिबी येणार, याचा फैसला दोन महिन्यात होणार आहे. मात्र यंदा राष्ट्रीय पक्षांच्या सत्तेच्या स्वप्नात रंग भरण्यात प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रादेशिक पक्षांचा दबदबा वाढला आहे. त्यामुळे यंदा भाजपा, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांना सत्तेचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मदत लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष किंगमेकर ठरू शकतात. 2014 मध्ये भाजपाला एकहाती सत्ता मिळाली. तब्बल दोन दशकांनंतर जनतेनं एका पक्षाला स्पष्ट कौल दिला. भाजपानं बहुमताचा आकडा पार केला. त्यांना 282 जागा मिळाल्या. भाजपानं मित्रपक्षांसह सत्ता स्थापन केली. मित्रपक्षांमुळे एनडीएचं संख्याबळ 336 वर पोहोचलं. मात्र यंदा निवडणुकीपूर्वी आलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीवर नजर टाकल्यास भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. त्यातच गेल्या काही वर्षांमध्ये एनडीएमधील काही घटक पक्षांनी साथ सोडल्यानं यंदा प्रादेशिक पक्षांची चांदी होऊ शकते. उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत भाजपानं 80 पैकी 71 जागा मिळवल्या होत्या. मात्र यंदा समाजवादी पार्टी-बहुजन समाज पार्टीनं आघाडी करत भाजपासमोर आव्हान उभं केलं आहे. बिहारमध्ये तर जवळपास संपूर्ण राजकीय परिघ प्रादेशिक पक्षांनी व्यापून टाकला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधात असलेला संयुक्त जनता दल आता भाजपासोबत आहे. संयुक्त जनता दलाचे जास्त आमदार असल्यानं त्या जोरावर त्यांनी अधिक जागा मागितल्या. विरोधकांच्या महाआघाडीचा सामना करण्यासाठी भाजपाला संयुक्त जनता दलाच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या. त्यासाठी भाजपाला आपल्या विद्यमान खासदारांची तिकीटं कापावी लागणार आहेत. महाराष्ट्रातही शिवसेनेनं भाजपाला जेरीस आणलं. काँग्रेस-राष्ट्रवादीचा सामना करण्यासाठी भाजपानं शिवसेनेसोबत युती केली. शिवसेनेनं गेल्या चार वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. युतीनंतरही शिवसेनेचा मोदीविरोध कायम आहे. निवडणुकीनंतर एनडीए पंतप्रधान ठरवेल, असं विधान काही दिवसांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यंदा चांगलं यश मिळण्याचा अंदाज आहे. मात्र तिथे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहील. निवडणुकीनंतर त्यांची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.ईशान्य भारतात भाजपानं अनेक लहान पक्षांसोबत आघाड्या केल्या आहेत. तमिळनाडूतही प्रादेशिक पक्षांभोवती निवडणूक फिरेल. ओदिशात बिजू जनता दल आणि तेलंगणात टीआरएसला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. हे दोन्ही पक्ष निवडणुकीनंतर काय करणार, याची उत्सुकता आहे. कर्नाटकात जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत आहे. हे दोन्ही पक्ष भाजपाविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर जेडीएसची भूमिका काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाJanta Dal Unitedजनता दल युनायटेडSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीNCPराष्ट्रवादी काँग्रेस