पर्यायी शाहीमार्गाबाबत प्रशासन आशावादी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब
By Admin | Updated: January 6, 2015 00:51 IST2015-01-05T22:04:07+5:302015-01-06T00:51:11+5:30
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी निघणारी शाही मिरवणूक पर्यायी मार्गाने (गणेशवाडी) नेण्याबाबत साधू-महंतांनी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासन आशावादी झाले असून, गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साधू-महंतांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यायी शाहीमार्गाबाबत प्रशासन आशावादी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी निघणारी शाही मिरवणूक पर्यायी मार्गाने (गणेशवाडी) नेण्याबाबत साधू-महंतांनी दाखविलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासन आशावादी झाले असून, गुरुवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत साधू-महंतांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुन्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण व त्या अनुषंगाने होणारे राजकारण पाहता, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जुन्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर साधू-महंतांनी पर्वणी काळात करावा यासाठी पहिल्यापासूनच प्रशासनाचे प्रयत्न असले, तरी त्याला अनेकविध कारणांनी फाटा देण्याचे काम केले जात होते. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या खुद्द पोलीस यंत्रणेनेच गणेशवाडीकडून येणार्या पर्यायी मार्गाबाबत प्रतिकूलता दर्शविली होती. या मार्गावर भाविकांना रोखणे अशक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे काही काळ बासनात बांधून ठेवलेला हा प्रस्ताव पुन्हा चर्चेत आला असून, महंत ग्यानदास यांनीही रविवारी पर्यायी मार्गाची पाहणी करून अनुकूलता दर्शविल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कुंभमेळ्याबाबत प्रशासनाची तयारी जाणून घेण्यासाठी महंत ग्यानदास यांनी पालकमंत्री, साधू-महंत व प्रशासन यांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी केल्याने त्यानुसार गुरुवार, दि. ८ रोजी पालकमंत्री महाजन नाशिक दौर्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणार्या बैठकीतच पर्यायी शाहीमार्गावर शिक्कामोर्तब करून घेण्यात येणार आहे. येत्या कंुभमेळ्यात साधू-महंतांनी या मार्गाचा वापर केल्यास तोच मार्ग कायमस्वरूपी घोषित होऊन प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.