प्रियकरासोबत रफुचक्कर झालेल्या तरुणीचा पालकांकडे जाण्यास नकार
By Admin | Updated: February 5, 2016 22:22 IST2016-02-05T22:22:21+5:302016-02-05T22:22:21+5:30
जळगाव: शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक तरुणी प्रियकरासोबत रफुचक्कर झाली. पालक व पोलिसांच्या मदतीने तिचा शोध लागलाही, परंतु तिने पालकांसोबत जाण्यास चक्क नकार देत प्रियकरासोबतच लग्न करण्याचा ह धरल्याने पालकांची मोठी पंचाईत झाली. यावर तोडगा निघेपर्यंत पोलिसांनी तिला आशादीप वसतीगृहात पाठविले आहे.

प्रियकरासोबत रफुचक्कर झालेल्या तरुणीचा पालकांकडे जाण्यास नकार
ज गाव: शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक तरुणी प्रियकरासोबत रफुचक्कर झाली. पालक व पोलिसांच्या मदतीने तिचा शोध लागलाही, परंतु तिने पालकांसोबत जाण्यास चक्क नकार देत प्रियकरासोबतच लग्न करण्याचा ह धरल्याने पालकांची मोठी पंचाईत झाली. यावर तोडगा निघेपर्यंत पोलिसांनी तिला आशादीप वसतीगृहात पाठविले आहे. गुुरुवारी ही तरुणी घरातून बाहेर पडली. प्रियकरासोबत पळून गेल्याचे लक्षात येताच पालकांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला. पालक व पोलिसांच्या मदतीने ती सापडली. पोलीस स्टेशनला आणल्यावर तिने पालकांसोबत जाण्यास नकार दिला. मुलगीचे वय अठरा वर्ष पूर्ण असल्याने कारवाईही करता आली नाही. एकमेकांची समजूत घातल्यानंतरही मुलगी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांनी तिला शुक्रवारी संध्याकाळी आशादीप वसतीगृहात पाठविले