शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगावरील ताशेरे हटविण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 02:00 IST

सुप्रीम कोर्ट; माध्यमांना वार्तांकनाचा अधिकार

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने  निवडणूक आयोगावर केलेल्या कठोर टीकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सहानुभूती व्यक्त केली. मात्र, न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केलेली टीकात्मक मते हटविण्यास स्पष्टपणे नकार दिला. तसेच सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध घालण्याची निवडणूक आयोगाची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असून अधिकाऱ्यांविरोधात मनुष्यवधाचे गुन्हा दाखल करायला हवे, अशी कठोर टीका मद्रास उच्च न्यायालयाने केली होती. त्याविरोधात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या टीकेमुळे आयोगाच्या प्रतिमेला तडा गेला असून न्यायालयाकडून व्यक्त करण्यात आलेली मते किंवा टिप्पणींचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना प्रतिबंध करावा, अशी मागणी आयोगाने केली होती. त्यावर सुनावणी करताना न्या. डी. वाय. चंद्रचूड आण‍ि न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने म्हटले, की उच्च न्यायालयाची टिप्पणी कठोर होती हे मान्य आहे. मात्र, न्यायालयाच्या मतांमधून सर्वसामान्य जनतेच्या भावना व्यक्त होत असतात. जनतेच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यात उच्च न्यायालयांची कायम महत्त्वाची भूमिका राहिली आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जनतेच्या हितांशी जुळलेल्या प्रकरणांमध्ये कटू प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. आम्हाला उच्च न्यायालयांचे पावित्र्य जपायचे आहे. मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी कडू औषधाप्रमाणे मानून घ्यावी, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने आयोगाची समजूतही घातली.

माध्यमांना स्वातंत्र्यn उच्च न्यायालयाची टिप्पणी न्यायालयीन आदेशात नमूद केलेली नसल्यामुळे ती हटविता येणार नाही.   राज्यघटनेने जनतेला बोलण्याचे आण‍ि व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तेच स्वातंत्र्य माध्यमांनाही आहे. n माध्यमांच्या स्वातंत्र्याचे आम्ही समर्थक आहोत. माध्यमांनी संपूर्ण सुनावणीचे वार्तांकन करायला हवे. नागरिकांना न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान काय घडले. सुनावणीदरम्यान होणारे दावे, प्रतिदावे व न्यायालयाची निरिक्षणे तसेच प्रश्न याबाबत माहिती मिळावी, हा नागरिकांचा अधिकार आहे. n ही माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध झाली पाहिजे आणि त्यामुळेच माध्यमांना वार्तांकनापासून रोखणे प्रतिगामी ठरेल.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक