Red Fort Blast: कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 21:36 IST2025-11-10T21:33:53+5:302025-11-10T21:36:54+5:30
दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ही कार आय२० असून ती हरयाणातील आहे.

Red Fort Blast: कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
Red Fort Blast News: दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ज्या कारमध्ये हा स्फोट झाला, त्याबद्दल दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांनी स्फोट झालेल्या कारबद्दल माहिती दिली.
स्फोटानंतर माध्यमांशी बोलताना पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले, "आज (१० नोव्हेंबर) सायंकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी एक हळूहळू आलेले एक वाहन रेड लाईटजवळ येऊन थांबले होते. त्यात हा स्फोट झाला आहे. त्यावेळी गाडीमध्ये काही प्रवाशी होते. या स्फोटामुळे आजूबाजूला असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. जशी याबद्दल माहिती मिळाली, तसे सगळ्या यंत्रणा घटना स्थळी आले."
"परिस्थितीची पाहणी करत आहे. या स्फोटाचा तपास केला जात आहे. या घटनेचा तपास करून जे काही आढळून येईल, ते माध्यमांना सांगितले जाईल. या घटनेत काही लोक जखमी झाले आहेत. काही लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मृतांचा निश्चित आकडा लवकरच सांगितला जाईल", अशी माहिती पोलीस आयुक्त गोलचा यांनी दिली.
#WATCH | Delhi: Blast near Red Fort Metro station | A team of Delhi Police Crime Branch arrives at the spot. pic.twitter.com/FpCj1FHqow
— ANI (@ANI) November 10, 2025
ज्या गाडीत स्फोट झाला ती आय २० होती. या गाडीची पासिंग गुरुग्रामची होती म्हणजे ती हरयाणातील होती. सध्या पोलीस ज्या ठिकाणी स्फोट झाला, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहे. या स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन एनआयएचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाात आहे.
#WATCH | Delhi: National Investigation Agency (NIA) officials arrive at the spot after the blast near Gate no 1 of the Red Fort Metro station in Delhi. pic.twitter.com/0nf1BcUPtz
— ANI (@ANI) November 10, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही देशाला या घटनेबद्दल माहिती दिली. "आज सायंकाळी जवळपास सात वाजता लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्ग सिग्नलजवळ आय २० ह्युंदाई कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटामुळे आजूबाजूच्या काही गाड्या, रस्त्याने जात असलेले लोक जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, काही लोकांचा मृत्यू झाला आहे.'