ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:16 IST2025-11-11T13:16:15+5:302025-11-11T13:16:48+5:30
Red Fort Blast, Delhi: पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पुरुषांना पकडून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता, तसेच महिलांना मोदींना जाऊ सांगा, असे सांगितले गेले होते.. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ आणि हवाई तळांवर हल्ले चढविले होते.

ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी...
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर देशातील जनतेचा संताप सोशल मीडियावर उफाळून आला आहे. या घटनेनंतर 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर नागरिकांनी पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करत 'ऑपरेशन सिंदूर २.०' हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आणला होता.
पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. पुरुषांना पकडून दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला होता, तसेच महिलांना मोदींना जाऊ सांगा, असे सांगितले गेले होते.. यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लाँच करत पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ आणि हवाई तळांवर हल्ले चढविले होते. कालच्या दिल्लीतीलस्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याने देशवासियांचे रक्त खवळले आहे. ऑपरेशन सिंदूरचा दुसरा टप्पा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सोशल मीडियावरील टॉप २० ट्रेंड्सपैकी तब्बल १७ ट्रेंड्स एकट्या स्फोटाशी संबंधित होते. स्फोटाच्या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांतच #OperationSindoor2_0 हा हॅशटॅग टॉप १० ट्रेंडमध्ये आला होता. अनेक युजर्सनी हा हॅशटॅग वापरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानविरुद्ध 'ऑपरेशन सिंदूर २.०' सुरू करण्याची मागणी केली.
काही युजर्सनी या घटनेला 'युद्धजन्य कृती' ठरवत, गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत मांडले. काही वेळातच यावर लाखो प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या होत्या.