लोकअदालतीत सव्वा कोटी रुपयांची वसुली
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:39+5:302015-02-14T23:51:39+5:30
औरंगाबाद : विधिसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात उभय पक्षाला यश आले. या प्रकरणातील तब्बल १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल झाले आहे.

लोकअदालतीत सव्वा कोटी रुपयांची वसुली
औ ंगाबाद : विधिसेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये तब्बल १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात उभय पक्षाला यश आले. या प्रकरणातील तब्बल १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल झाले आहे. १४ फेब्रुवारी रोजी बँका आणि अन्य वित्तीय संस्थांशी संबंधित कर्जवसुली प्रकरण, धनादेश अनादर प्रलंबित खटले आणि वादपूर्व प्रकरणांसाठी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या या लोकअदालतीमध्ये भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, कॉर्पोरेशन बँक, युनियन बँक, अलाहाबाद बँक, कॅनरा बॅँक, विजया बँक, वैैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल बँक, देना बँक, इंडियन ओव्हरसिज बँक,भारतीय समृद्धी फायनान्स आदी वित्तीय संस्थांची २७४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये उभय पक्षाचे वादी, प्रतिवादी आणि वकील सहभागी झाले होते. यापैैकी १६९ प्रकरणांत तडजोड करण्यात संबंधितांना यश आले. यात १ कोटी ३० लाख ७३ हजार ९७६ रुपये वसूल करण्यात आले. जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव त्रिं.बा. जाधव यांनी या लोकअदालतीचे आयोजन केले होते. याप्रसंगी न्यायाधीश के. व्ही. मोरे, न्यायाधीश एच. ए. अन्सारी, न्यायाधीश एस. डब्ल्यू उगले, न्यायाधीश ए. बी. निवारे पॅनलप्रमुख म्हणून उपस्थित होते, तर ॲड. ए. के. ठाकरे, ॲड. सलीम चाऊस, ॲड. संजय शेळके, ॲड. सुहास जोशी, ॲड. अजित गायकवाड, ॲड. विष्णू खणके, ॲड. एस. के. आमराव हे पॅनल पंच म्हणून उपस्थित होते.