शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

महाराष्ट्रातील 38 हजार वाहनांची ‘जीपीएसवर’ टाेलवसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 7:05 AM

चाचणीचा दुसरा टप्पा, देशभरात १ लाखाहून अधिक वाहनांचा समावेश

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : टाेलवसुलीसाठी काही वर्षांपूर्वी फास्टॅग यंत्रणेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आता त्यात लवकरच बदल हाेणार आहे. जीपीएसवर आधारित टाेलवसुली करण्यात येणार असून, त्याची चाचणी पुढील टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात सर्वाधिक ३८ हजार वाहने महाराष्ट्रातील आहेत.

केंद्र सरकारने दाेन वर्षांपूर्वी टाेलवसुलीसाठी सर्व चारचाकी व त्यापेक्षा माेठ्या वाहनांना फास्टॅग बंधनकारक केला. त्यानंतर आता जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून टाेलवसुलीच्या नव्या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत काही महिन्यांपूर्वीच माहिती दिली हाेती. आता या यंत्रणेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात मुंबई-दिल्ली काॅरिडाॅरमध्ये काही ट्रॅकमध्ये याची चाचणी करण्यात आली हाेती. ट्रॅकमध्ये एक ऑनबाेर्ड युनिट बसविण्यात आले हाेते. त्याचा मार्ग ट्रॅक करण्यासाठी इस्राेच्या नेव्हिगेशन उपग्रहाच्या मदतीचा वापर करण्यात आला हाेता. हा प्रयाेग यशस्वी झाल्यानंतर आता त्याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. रशिया आणि दक्षिण कोरियाच्या तज्ज्ञांकडून एक अहवाल तयार करण्यात येत आहे. यातील मुद्द्यांच्या आधारे परिवहन धोरणात बदल करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जीपीएस ट्रॅकिंगने ठरणार टाेलची रक्कमटाेलमार्गावर गाडी किती किलाेमीटर धावते, त्यानुसार टाेल आकारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणेचा वापर हाेणार आहे. वाहनमालकाच्या खात्यातून तेवढा टाेल कापण्यात येईल. ही पद्धत फास्टॅगसारखीच असेल. जर्मनी आणि रशियामध्ये या पद्धतीचा माेठ्या प्रमाणावर वापर हाेत आहे. ही यंत्रणा लागू केल्यानंतर देशातील सर्व टाेल नाके हटविण्यात येतील.

या राज्यांमध्ये दुसरा टप्पादुसऱ्या टप्प्यात देशभरातील १.३७ लाख वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रात ३८,६८०, दिल्लीत २९,७०५, उत्तराखंडमध्ये १४,४०१, छत्तीसगडमध्ये १३,५९२, हिमाचलप्रदेशात १०,८२४ आणि गाेव्यात ९,११२ वाहनांचा समावेश आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीgoogleगुगल