वाङ्मयीन पुरस्कार देणार्‍या निवड समित्यांची पुनर्रचना

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:22+5:302015-02-14T23:52:22+5:30

Reconstruction of the selection committees for award of literary award | वाङ्मयीन पुरस्कार देणार्‍या निवड समित्यांची पुनर्रचना

वाङ्मयीन पुरस्कार देणार्‍या निवड समित्यांची पुनर्रचना

>मुंबई : साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या नामवंत साहित्यिकास व निर्मितीमध्ये मोलाचे कार्य करणार्‍यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली निवड समित्यांची पुनर्रचना करण्यात आली आहे.
साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणार्‍या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस श्री.पु.भागवत यांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला असून पुरस्काराचे स्वरुप रुपये ३ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. नामवंत साहित्यिकास देण्यात येणार्‍या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून राबविण्यात येणार्‍या योजना २०१२-१३ पासून मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आल्याने ही पुनर्रचना करण्यात आली असून पुरस्कार निवडीचे निकष निि›त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे असतील. मंत्री (मराठी भाषा), सचिव (मराठी भाषा विभाग), अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Reconstruction of the selection committees for award of literary award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.