‘आयुष्मान’ वयोमर्यादा ७० ऐवजी ६० वर्षे करण्याची शिफारस; काय आहे योजना? कुणाला मिळतो लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 06:51 IST2025-03-16T06:50:35+5:302025-03-16T06:51:32+5:30
जास्तीत जास्त लोकांना या आरोग्यविषयक योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशी केल्या आहेत.

‘आयुष्मान’ वयोमर्यादा ७० ऐवजी ६० वर्षे करण्याची शिफारस; काय आहे योजना? कुणाला मिळतो लाभ
नवी दिल्ली : मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा असलेल्या आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रतेची वयोमर्यादा ७० ऐवजी ६० वर्षे करण्यात यावी आणि आर्थिक मदतीची रक्कम ५ ऐवजी १० लाख रुपये करण्यात यावी, अशी शिफारस आरोग्य व कुटुंब कल्याणविषयक विशेष समितीने केली आहे. जास्तीत जास्त लोकांना या आरोग्यविषयक योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशी केल्या आहेत.
काय आहे योजना?
आयुष्मान भारत ही जगातील सर्वांत मोठी विमा योजना असून देशातील ४० टक्के गरीब लोकांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची यात तरतूद आहे. या योजनेत निवडक सरकार व खासगी रुग्णालयांत उपचारांची सुविधा असून भरती होण्यापूर्वी १० दिवस आणि नंतरच्या वाहतुकीसह इतर खर्चाची तरतूद या योजनेत आहे. ४.५ कोटी कुटुंबातील ७० वर्षांवरील ६ कोटी नागरिकांना केंद्र सरकारने या योजनेतून संरक्षण दिले आहे.
लाभ कोणाला?
ग्रामीण भागात राहणारे नागरिक
अनुसूचित जाती-जमातीचे आणि आदिवासी लोक
असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार
दारिद्र्यरेषेखालील लोक
रोजंदारीवर काम करणारा कामगार
कुटुंबात कोणी दिव्यांग असल्यास
या योजनेला प. बंगालसह अनेक राज्यांनी विरोध करीत आपल्या राज्यांच्या योजना चालवल्या आहेत.