शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा हाताळणीला दणका, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 21 खाणींना 2 महिन्यांसाठी मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 20:26 IST

राज्यातील मुरगाव बंदरात प्रदूषणाची पर्वा न करता होणा-या कोळसा हाताळणीला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला.

पणजी : राज्यातील मुरगाव बंदरात प्रदूषणाची पर्वा न करता होणा-या कोळसा हाताळणीला गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दणका दिला आहे. साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेड (एसडब्ल्यूपीएल) कंपनीला 1981 सालच्या जल आणि हवा प्रदूषण नियंत्रण कायद्याखाली मंडळाने दिलेले कन्सेन्ट टू ऑपरेट परवाने सोमवारी मागे घेतले. हे परवाने नसताना ही कंपनी कोळसा हाताळणी करू शकत नाही व त्यामुळे कंपनीच्या व्यवस्थापनाने कोळसा हाताळणी निलंबित करावी, असा आदेश मंडळाने दिला आहे. राज्यातील 21 खनिज खाणींना दोन महिन्यांसाठी मार्च 2018 पर्यंत मंडळाने कन्सेन्ट टू ऑपरेट देण्याचा निर्णय घेतला.गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची सोमवारी दिवसभर बैठक झाली. साऊथ वेस्ट पोर्ट लिमिटेड कंपनीच्या कोळसा हाताळणीचा विषय यापूर्वी खूप गाजला आहे. या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. कंपनीने नोटिशीला उत्तर पाठवल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधीला सोमवारी बोलावून घेऊन मंडळाने सुनावणी केली. सुनावणीनंतर मंडळाच्या बैठकीत तपशीलवार चर्चा झाली आणि कन्सेन्ट टू ऑपरेट मागे घेण्याचा निर्णय झाला. कारण या कंपनीने ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात कोकिंग कोलची हाताळणी केली.मंडळाच्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यास वेळ मिळावा म्हणून ही कंपनी यापूर्वी उच्च न्यायालयातही गेली होती. मंडळाने मग दोन आठवड्यांचा अतिरिक्त वेळ कंपनीला दिला होता. तसेच या कंपनीला व्यक्तिगत सुनावणी द्यावी असेही ठरवले होते. 30 नोव्हेंबर 2017 रोजी मंडळाने कंपनीला दिलेल्या नोटिशीला 28 डिसेंबर 2017 रोजी उत्तर आले.5.987 एमएमटी अतिरिक्त हाताळणी मंडळाने कंपनीला 4.125 वार्षिक एमएम टन कोळसा हाताळणी करण्यास जल व हवा कायद्यांतर्गत मान्यता दिली होती. मात्र कंपनीने 2016-17 या काळात 10.112 एमएम टन एवढी कोळसा हाताळणी केली, अशी नोंद मंडळाने मुरगाव बंदराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केली आहे. या कंपनीने कन्सेन्ट टू ऑपरेटच्या सूचनेचा भंग करत 5.987 एमएमटी अतिरिक्त कोळसा हाताळणी केली, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.