शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षांत तीन वेळा आठवण केली, तरीही काम होईना; अनेक मंत्रालयांवर पंतप्रधान मोदी नाराज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 05:54 IST

कॅबिनेट सचिवालय हे थेट पीएमओअंतर्गत आहे. या सचिवालयाने मंत्रालयांना पत्र पाठविले आहे.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : आंतरमंत्रालयीन सल्लामसलत करण्यासाठी जेव्हा मसुद्याची प्रत पाठविली जाते तेव्हा कॅबिनेट सचिवालयाच्या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या काही मंत्रालये आणि विभागांवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही मंत्रालये आणि विभाग पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालयाला मसुद्याची प्रत पाठवत नसल्याचे दिसून आले आहे, असे सचिवालयाने सर्व मंत्रालयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मंत्रालय आणि विभागांच्या सर्व सचिवांना पाठविलेल्या पत्राची प्रत ‘लोकमत’कडे आहे. कॅबिनेट सचिवालयातील अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी आशुतोष जिंदाल यांनी पत्र पाठवून सांगितले आहे की, गेल्या सात वर्षांत तीन वेळा याबाबत आठवण देण्यात आलेली आहे. मात्र, या सूचनांचे काही मंत्रालय आणि विभागांकडून पालन केले जात नाही. कॅबिनेट सचिवालय हे थेट पीएमओअंतर्गत आहे. ताज्या पत्रात म्हटले आहे की, विहित प्रक्रियेचे पालन केल्याने मसुद्याची काळजीपूर्वक तपासणी होऊ शकते आणि विसंगती सुधारण्यास मदत होते. 

शहरी नक्षलींना नेस्तनाबूत करणार : मोदी

भरूच : शहरी नक्षली आपला वेश बदलून गुजरातमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, हे राज्य त्यांना नेस्तनाबूत करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे म्हटले. भरूच जिल्ह्यात देशातील पहिल्या बल्क ड्रग पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आम आदमी पार्टीवरही जोरदार हल्ला चढवला. शहरी नक्षलवादी नव्या रूपात राज्यांत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आमच्या भोळ्याभाबड्या, उत्साही तरुणांची दिशाभूल करत आहेत, असे मोदी म्हणाले. यावर्षीच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणुका होणार आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी