शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

"संघानं सांगितलं तर पद सोडायला तयार...!", RSS च्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं मोठं विधान; काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 19:42 IST

भागवत म्हणाले, संघाने आधीपासूनच ठरवले आहे की, संपूर्ण समाजाला संघटीत करण्याशिवाय, संघाला आणखी कुठलेही काम करायचे नाही. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबई येथे आयजित संघाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात विविध विषयांवर आपली मते मांडली. दरम्यान, त्यांनी निवृत्तीसंदर्भातील एका प्रश्नावरही भाष्य केले. वयाची अट असूनही संघाने त्यांना काम सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे त्यांनी यावेली सांगितले. मात्र, ज्या क्षणी संघ त्यांना पद सोडण्यास सांगेल, त्या क्षणी आपण पदमुक्त होऊ, असेही भागवत यांनी यावेली स्पष्ट केले.

मोहन भागवत म्हणाले, "संघाचे काम प्रचार करणे नाही, तर समाजात संस्कार रुजवणे आहे. प्रमाणापेक्षा अधिक प्रसिद्धीने अहंकार निर्माण होतो. यामुळे प्रसिद्धी ही योग्य वेळी आणि मर्यादित स्वरूपात असावी. एवढेच नाही तर, "संघ हा आपल्या स्वयंसेवकाकडून रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करून घेतो आणि संघाच्या इतिहासात आतापर्यंत कुणालाही जबरदस्तीने निवृत्त करण्याची वेळ आलेली नाही," असेही त्यांनी आवर्जून सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ७५ वर्षांनंतर पद सोडण्याची परंपरा असल्याचे बोलले जाते. तसेच, सरसंघचालक कोण होऊ शकते? यासंदर्भात बोलताना भागवत म्हणाले, "सरसंघचालक पदासाठी क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा ब्राह्मण असणे ही पात्रता नाही, तर जो हिंदू संघटनेसाठी कार्य करतो, तोच सरसंघचालक बनतो. संघाचे हे पद सर्वोत्तम उमेदवारालाच मिळते." तसेच, सरसंघचालक पदासाठी कुठलीही निवडणूक होत नाही. सर्वसाधारणपणे बोलले जाते की, वयाच्या 75 वर्षांनंतर कुठल्याही पदाशिवाय काम करायला हवे.

भागवत म्हणाले, संघाने आधीपासूनच ठरवले आहे की, संपूर्ण समाजाला संघटीत करण्याशिवाय, संघाला आणखी कुठलेही काम करायचे नाही. 

देशात चार प्रकराचे हिंदू - तत्पूर्वी कालच्या सत्रात बोलताना भागवत म्हणाले होते, "भारतातील मुस्लीम आणि ख्रीश्चन, हे इतर देशातील मुस्लीम आणि ख्रिश्ननांप्रमाणे नाहीत. त्यांचे वेगळेपण कुठूण आले? ते भारतीय आहे." भागवत पुढे म्हणाले, "यामुळेच तर आम्ही म्हणतो, की चार प्रकारचे हिंदू आहेत. आणखी तर कुणी नाहीत. एक आहेत, 'गर्व सें कहों हम हिंदू है.' दुसरे आहेत, आहोत आम्ही हिंदू आणि राहूत, गर्व वैगेरे कशाला, असतात लोक, आम्हीही आहोत, राहू. तिसरे आहे. 'जोरसे मत बोलो हम हिंदू है,' घरात येऊन विचाराल तर सांगू, बाहेर सांगणार नाही, आहेत त्यांची काही कारणं. आणि चौथे म्हणजे, जे विसरले आहेत. ज्यांना, विसर पाडला गेला, त्यांनी विस्मृतीतच रहावे, अशी व्यवस्था असते. तसे करणारे लोक असतात. आणखी लोकांनी विसरावे आणि तिकडे सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

"कारण भारत मोठा झाला, तर जगातील काही स्वार्थी शक्तींच्या स्वार्थाचे दुकान बंद हईल. यामुळे सर्व जण आपल्याशी मैत्रीही करत आहेत आणि वेळो वेळी शत्रूत्वही दाखवतात. या सर्वांचा उपाय म्हणजे सामर्थसंपन्न राष्ट्र. त्यासाठी संघटित, गुणवान समाज असावा लागतो," असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले." 

English
हिंदी सारांश
Web Title : Ready to Resign if RSS Says So: Mohan Bhagwat

Web Summary : Mohan Bhagwat stated he's ready to resign if the RSS asks. He emphasized the importance of instilling values over publicity and highlighted that the RSS doesn't force retirement. He also spoke about inclusivity in selecting a successor and uniting society.
टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ