शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच मिळणार स्वत:च्या मालकीचे विमान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 11:45 AM

दीर्घ प्रवासादरम्यान या विमानाला इंधन भरण्यासाठी उतरावे लागत असे.

नवी दिल्ली: भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना लवकरच स्वत:च्या मालकीचे विमान मिळणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. केंद्र सरकारने एअर इंडियाकडून बोईंग 777-300 एक्सेंटेड रेंज या प्रकारातील दोन विमाने विकत घेतली आहेत. सध्या या विमानांमध्ये व्हीआयपी कक्ष, पत्रकार परिषदेसाठीची खोली आणि अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठीचा कक्ष तयार करण्याचे काम सुरु आहे. याशिवाय, या विमानात वायफाय आणि क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणाही असेल, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी सरकारमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यासाठी केंद्राने एअर इंडियाकडून बोईंग-777 हे विमान विकत घेतले होते. मात्र, या दीर्घ प्रवासादरम्यान या विमानाला इंधन भरण्यासाठी उतरावे लागत असे. मात्र, 777-300 एक्सेंटेड रेंज ही दोन्ही विमानं भारत ते अमेरिका हा दीर्घ पल्ल्याचा प्रवास न थांबता करू शकतात. 2006 साली एअर इंडियाकडून एअरोस्पेसला 68 विमाने तयार करण्याची ऑर्डर दिली होती. या खरेदी व्यवहारातील अखेरची तीन विमाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एअर इंडियाला मिळाली होती. त्यापैकी दोन विमाने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसाठी राखून ठेवण्यात आली आहेत. यामुळे भविष्यात एअर इंडियाला पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विमान राखून ठेवण्याची गरज उरणार नाही.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRamnath Kovindरामनाथ कोविंदPresidentराष्ट्राध्यक्षprime ministerपंतप्रधान