"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 17:40 IST2024-12-13T17:38:43+5:302024-12-13T17:40:38+5:30

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला... पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला...

"Read the history of your governments, those who destroy the Constitution can never be its protectors Union Minister lalan singh attacks Priyanka-Rahul Gandhi in lok sabha | "अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

"अपल्या सरकारांचा इतिहास वाचा, संविधान भक्षक कधी रक्षक होऊ शकत नाहीत..."; केंद्रीय मंत्र्याचा प्रियंका-राहुल गांधींवर हल्लाबोल

संविधान दिनानिमित्त लोकसभेतील चर्चेदरम्यान मुंगेरचे जेडीयू खासदार तथा केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ ​​ललन सिंह यांनी काँग्रेस पक्षावर जबरदस्त हल्ला चढवला. ललन सिंह म्हणाले, "आपल्या संविधान निर्मात्यांनी संविधान बनवले, तेव्हा त्यात दोन पैलूंसंदर्भात सांगण्यात आले आहे. संविधानातील एक पैलू, सर्व घटकांसाठी सामाजिक आणि आर्थिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करतो. तर दुसरीकडे, संविधानाशी छेडछाड करणाऱ्यांना कुठे जागा द्यायची, याचीही तरतूद त्यात आहे.

लालन सिंह पुढे म्हणाले, "या देशावर अनेक लोकांनी दीर्घकाळ राज्य केले आहे. नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात या देशात केलेली सर्व चांगली कामे राजनाथ सिंह यांनी सविस्तरपणे सांगितली आहेत. त्या कामांमध्ये एक मूलमंत्र आहे, जो याच संविधानातून निघाला आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास' हाच आपल्या संविधानाचा मूल मंत्र आहे. ही गोष्ट यांना (विरोधी पक्षांना) कुठे सजणार"

ललन सिंह म्हणाले, या लोकांनी देशात एवढे दीर्घकाळ राज्य केले. या काळात त्यांनी शेकडो वेळा संविधानाचा अवमान केला. यामुळे, आज संविधानाने त्यांना तेथे बसवले आहे, जेथे 15 वर्षांपसून फिरत आहेत. प्रियांका गांधी यांचे नाव न घेता लालन सिंह म्हणाले, काँग्रेसच्या महिला खासदाराने आपल्या पहिल्याच भाषणात सरकारवर आणि पंतप्रधानांवर अत्यंत व्यंगात्मक पद्धतीने निशाणा साधला. 'अरे आपल्याला माहीत नाही, जरा आपल्या पूर्वजांनी या देशावर जे शासन केले आहे त्यांचाही इतिहास वाचा. आपल्याकडे एक म्हण आहे, 'सौ चूहे खाकर, बिल्ली चली हज को'.

ललन सिंह पुढे म्हणाले, जे संविधानाचे भक्षक आहेत, ते आजकाल संविधानाची कॉपी घेऊन, अशा पद्धतीने फिरत आहेत, जसे काही संविधानाचे केवढे रक्षक आहेत. राहुल गांधींचे नाव न घेता, ललन सिंह म्हणाले, 'जे संविधानाचे भक्षक आहेत, ते संविधानाचे रक्षक कधीही होऊ शकत नाहीत. जेव्हा आपण संविधानाची प्रत घेऊन फिरता, तेव्हा जनता आपल्यावर हसते. किमान महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतून तरी आपण धडा घ्यायला हवा होता. थोडे सुधरलात तर पुढे ठीक राहील.

लालन सिंह पुढे म्हणाले, "यांनी आपल्या सोयीसाठी घटनेत कलम 356 ची तरतूद केली. भीमराव आंबेडकरांनी कलम 356 च्या तरतुदीला राज्यघटनेचे मित्रपत्र म्हटले आहे. अर्थात ते केवळ विशेष परिस्थितीतच वापरले जायला हवे. मात्र, यांचा इतिहास आहे की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कलम 356 चा 7 वेळा वापर केला. इंदिरा गांधींनी 356 चा 51 वेळा वापर केला. राजीव गांधींच्या काळात 6 वेळा वापरले गेले. पीव्ही नरसिंह राव यांच्या काळात 11 वेळा आणि मनमोहन सिंग सरकारच्या काळात 12 वेळा कलम 356 वापरण्यात आले. यांनी संविधानाच्या आत्म्याला कलंक लावण्याचे काम केले."
 

Web Title: "Read the history of your governments, those who destroy the Constitution can never be its protectors Union Minister lalan singh attacks Priyanka-Rahul Gandhi in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.