इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्ससाठी पुन्हा संधी; २४ मेपर्यंत अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 01:02 IST2020-05-20T01:01:45+5:302020-05-20T01:02:27+5:30
अॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना जेईई मेन्ससाठी पुन्हा संधी; २४ मेपर्यंत अर्ज
- एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : विदेशांत अभियांत्रिकीच्या शिक्षणाचे स्वप्न कोविड-१९ मुळे भंगलेल्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन्ससाठी दुसऱ्यांदा अर्ज उपलब्ध केले आहेत. यामुळे इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेसाठी जेईई मेन्सचा अर्ज भरू न शकलेले विद्यार्थी २४ मेपर्यंत अर्ज करू शकतील. अॅप्लिकेशन विंडो मंगळवारी खुली झाली. एनटीएचे महासंचालक विनीत जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, केंद्रीय मानवसंसाधन मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात आहे. २५ ते ३१ मे दरम्यान जुन्या आणि नव्या अर्जांत दुरुस्तीची संधी विद्यार्थ्यांना आहे. ही मात्र शेवटची संधी आहे. जेईई मेन्स परीक्षा १८ ते २३ जुलै, २०२० दरम्यान तर जेईई अॅडव्हान्स परीक्षा २३ आॅगस्ट, २०२० रोजी होईल.
काय म्हणाले मंत्री निशंक
- मंत्री निशंक यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, ज्या विद्यार्थ्यांनी विदेशात शिक्षणाचा विचार सोडून दिला त्यांना भारतात शिक्षणाची संधी दिली जात आहे.
- कोणत्याही कारणाने जेईई मेन्ससाठी अर्ज भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना २४ मे रोजी सायंकाळ पाच वाजेपर्यंत अर्ज करता येतील. शुल्क रात्री ११.३० वाजेपर्यंत डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे करता येईल. जेईई मेन्समध्ये दुरुस्तीची संधी २५ ते ३१ मे दरम्यान पुन्हा दिली जाईल.
- आधीच रजिस्ट्रेशन केलेल्या ८.३२ लाख विद्यार्थ्यांनाही त्यांच्या फॉर्ममध्ये दुरुस्तीची संधी दिली गेली आहे. विशेषत: कोविड-१९ मुळे विद्यार्थ्याला आपले केंद्र जर दुसºया शहरात हवे असेल तर त्याने त्याला पहिल्या क्रमांकावर प्राधान्य द्यावे.