शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

असं आणलं गेलं पुलवामा हल्ल्यासाठीचं RDX, एनआयएच्या आरोपपत्रामधून खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 15:28 IST

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता.

ठळक मुद्दे पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्याबाबतचं ५ हजार पानांचं आरोपपत्र तयार केलं आरोपपत्रामध्ये पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर यांची नावे आरोपी म्हणून नमूद पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते

नवी दिल्ली/श्रीनगर - गतवर्षी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले होते. या हल्ल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या जीवितहानीमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. दरम्यान, या हल्ल्यासाठी RDXचा वापर झाल्याचे तपासातून उघड झाल्यानंतर हे आरडीएक्स नेमकं आलं कुठून असा सवाल सातत्याने विचारण्यात येत होता. मात्र आता पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने या हल्ल्याबाबतचं ५ हजार पानांचं आरोपपत्र तयार केलं आहे. हे आरोपपत्र आज न्यायालयात सादर होण्याची शक्यता आहे. तसेच या आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक दावे करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपपत्रामध्ये पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर आणि रौफ अझगर यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली आहेत. तसेच पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यामधील बसवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेले आरडीएक्स हे पाकिस्तानमधून आणण्यात आले होते, असे एनआयएच्या तपासात समोर आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.मिळत असलेल्या माहितीनुसार आरडीएक्ससह अन्य स्फोटके दहशतवादी पाठीवर लादून घेऊन आले होते. तसेच या प्रकरणातील एक अन्य आरोपी असलेला इक्बाल रादर हा उमर फारुख या दहशतवाद्याला रात्रीच्या अंधारामध्ये नियंत्रण रेषा पार करवून काश्मीर खोऱ्यात घेऊन आला होता. एनआयएला या संदर्भातील व्हिडीओ पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये अमावस्येच्या रात्री घुसखोरी करण्याच्या कारस्थानाचा उल्लेख आहे. हा व्हिडीओ एनआयएला उमर फारुखच्या मोबाइलमध्ये मिळाला होता. या फोनमधील माहितीवरून तपास यंत्रणेला दहशतवाद्यांच्या कारस्थानाची माहिती मिळाली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले अमोनियम नायट्रेड आणि नायट्रो ग्लिसरिन यासारखे पदार्थ स्थानिक पातळीवर गोळा केले होते. दरम्यान, यातील काही स्फोटके ही दहशतवाद्यांनी काश्मीरमधून ऑनलाइन खरेदी केली होती, असेही या आरोपपत्रात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार झालंय खास एअर इंडिया वन विमान, अशी आहेत वैशिष्ट्ये

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत