Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 19:39 IST2025-06-04T19:39:12+5:302025-06-04T19:39:46+5:30

RCB’s victory celebration in Bengaluru : आज बंगळुरुमध्ये RCB संघासाटी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली.

rcb-victory-parade-in-bengaluru-rush-in-mg-road-and-cubbon-park-metro-stations | Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही

Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही

RCB’s victory celebration in Bengaluru : तब्बल 18 वर्षांनंतर IPL ट्रॉफी जिंकणाऱ्या RCB संघासाठी बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, यादरम्यान चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. यात सात ते आठ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. फक्त स्टेडियमच नाही, तर बंगळुरुतील अनेक भागात आज प्रचंड गर्दी झाली आहे. शहरातील रस्ते आणि मेट्रो स्टेशनवर तर पाय ठेवायलाही जागा नाही.

RCB च्या विजयानंतर बंगळुरुत जल्लोषाचे वातावरण
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल विजेता झाल्यानंतर कर्नाटकची राजधानी बंगळुरुमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. काल रात्री उशिरापासून आरसीबीचे चाहते रस्त्यावर आनंदोत्सव साजरा करत आहेत. दरम्यान, आज बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीची संघासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या आवडत्या संघाला पाहण्यासाठी चाहत्यांनी तोबा गर्दी केली. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही करावा लागला. यादरम्यान, अचानक चेंगराचेंगरी झाली, ज्यात 7-8 जणांचा मृत्यू, तर अनेक लोक गंभीर जखमी झाले.

बंगळुरू मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ व्हायरल 
आज फक्त स्टेडियमच नाही, तर बस स्थानकापासून मेट्रो स्टेशनपर्यंत मोठी गर्दी झाली आहे. आरसीबीच्या विजयी परेडमुळे चिन्नास्वामी स्टेडियमभोवती वाहनांच्या प्रवेशावर बंदी असल्याने, बहुतांश चाहते मेट्रोने स्टेडियममध्ये पोहोचत होते. त्यामुळे आज दुपारपासून एमजी रोड आणि क्यूबन पार्क मेट्रो स्टेशनवर गर्दीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या बंगळुरुमधील एका मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्टेशनवर तोबा गर्दी दिसत आहे. यावेळी मेट्रो रेल्वेच नाही, तर स्टेशनवरही पाय ठेवायला जागा नाही. 
 

Web Title: rcb-victory-parade-in-bengaluru-rush-in-mg-road-and-cubbon-park-metro-stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.