९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 06:35 IST2025-04-01T06:35:02+5:302025-04-01T06:35:37+5:30
RBI Repo Rate: भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू होत आहे.

९ एप्रिलनंतर घर, कारखरेदी स्वस्त होणार?
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक येत्या ९ एप्रिल रोजी रेपो दरात कपात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे घर आणि कार खरेदी स्वस्त होऊ शकते.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ७ एप्रिल रोजी सुरू होत आहे. त्यातील निर्णयांची घोषणा ९ एप्रिल रोजी होईल. त्यादिवशी आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा कोणती घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या किरकोळ महागाईत घसरण होत आहे. वृद्धीदर कमी होत आहे. अशा स्थितीत व्याजदर कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय रिझर्व्ह बँकेसमोर नाही. रिझर्व्ह बँकेने आता महागाई नियंत्रणाऐवजी वृद्धीदरास बळ देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.