शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Gujarat Election 2022: "अभी भी टाइम है समझ जाओ...", बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करून जडेजाने घातली भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 20:02 IST

रवींद्र जडेजाने बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करून गुजरातच्या जनतेला केले भावनिक आवाहन केले आहे.

जामनगर : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची (Ravindra Jadeja) पत्नी गुजरात विधानसभेच्या रिंगणात आहेत. रिवाबा जडेजा या गुजरातमधील जामनगर येथून भाजपच्या उमेदवार आहेत. त्यामुळे पत्नीच्या प्रचारासाठी जडेजा मैदानात उतरला आहे. खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी जामनगरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. जडेजाने विविध माध्यमातून आपल्या पत्नीला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच त्याने आता बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करून गुजरातच्या जनतेला भावनिक आवाहन केले आहे. 

जडेजाने घातली भावनिक साद दरम्यान, रवींद्र जडेजाने बाळासाहेबांच्या भाषणातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणत आहेत की, "माझे म्हणणे एवढेच आहे की जर तुम्ही नरेंद्र मोदीला बाजूला केले तर गुजरात तुमचा गेला. हे माझे वाक्य मी अडवाणींपाशी बोललेलो आहे." रवींद्र जडेजाने बाळासाहेबांचा हा जुना व्हिडीओ शेअर करून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. 

रिवाबा यांच्यासाठी मोठ्या नेत्याचे तिकीट कापलेभाजपने जामनगर उत्तरमधून भारतीय क्रिकेटपटू आणि जामनगरचा रहिवासी असलेल्या रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना उमेदवारी दिली आहे. रिवाबा यांना राजकारणाचा किंवा निवडणूक लढविण्याचा कोणताही पूर्व अनुभव नाही. विशेष म्हणजे, रिवाबा यांच्यासाठी भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह यांचे तिकीट कापले आहे.

गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदानगुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. मागील २७ वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022ravindra jadejaरवींद्र जडेजाNarendra Modiनरेंद्र मोदीBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेGujaratगुजरात