शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

वैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 7:28 AM

कोरोनाचा परिणाम; आरोग्य विम्याचा टक्का सर्वाधिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण वाढत असताना वैयक्तिक अपघात विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मोटार विमा काढणाऱ्यांचा टक्काही घटला असून आगीसारख्या दुर्घटनांसाठी विमा काढण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुपटीने वाढल्याचे इन्श्युरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाची (आयआरडीएआय) आकडेवारी सांगते.

२०१८ च्या तुलनेत गेल्या वर्षी प्रीमियमची रक्कम १४ टक्क्यांनी वाढली होती. यंदा त्यात फक्त ४ टक्क्यांची भर पडली आहे. एप्रिल ते आॅगस्ट, २०१८ या पाच महिन्यांत विविध श्रेणीतल्या विम्याच्या प्रीमियमपोटी विमा कंपन्यांच्या तिजोरीत ६२ हजार ७३२ कोटींचा प्रीमियम जमा झाला होता. गेल्या वर्षी तो आकडा ७१ हजार ४०४ कोटींवर गेला. यंदा कोरोनामुळे प्रत्येक जण आर्थिक संकटात असला तरी कंपन्यांकडील प्रीमियमची वसुली ७३ हजार ९६५ कोटींवर झेपावली आहे. सर्वाधिक १६ टक्के घट मोटार विम्यात झाली असून, त्याखालोखाल मरिन विम्याचा (१४ टक्के) क्रमांक लागतो.वैयक्तिक अपघात विम्यापोटी गतवर्षी २१०२ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना मिळाला होता. यंदा त्यात ९ टक्के घट होऊन १ हजार ९१९ कोटी रुपये जमा झाले आहेत.मोटार विम्याकडे दुर्लक्षयंदा मोटार विमा २२ हजार २५४ कोटी इतका कमी झाला आहे. तर दुसरीकडे कोराना प्रादुर्भावाच्या भीतीने आरोग्य विमा २२ हजार ९०३ कोटी झाला आहे.

टॅग्स :Healthआरोग्य