The rate of personal accident insurance has dropped | वैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले

वैयक्तिक अपघात विमा काढण्याचे प्रमाण घटले

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संक्रमणाच्या काळात आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण वाढत असताना वैयक्तिक अपघात विमा काढणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. मोटार विमा काढणाऱ्यांचा टक्काही घटला असून आगीसारख्या दुर्घटनांसाठी विमा काढण्याचे प्रमाण दोन वर्षांत दुपटीने वाढल्याचे इन्श्युरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी आॅफ इंडियाची (आयआरडीएआय) आकडेवारी सांगते.


२०१८ च्या तुलनेत गेल्या वर्षी प्रीमियमची रक्कम १४ टक्क्यांनी वाढली होती. यंदा त्यात फक्त ४ टक्क्यांची भर पडली आहे. एप्रिल ते आॅगस्ट, २०१८ या पाच महिन्यांत विविध श्रेणीतल्या विम्याच्या प्रीमियमपोटी विमा कंपन्यांच्या तिजोरीत ६२ हजार ७३२ कोटींचा प्रीमियम जमा झाला होता. गेल्या वर्षी तो आकडा ७१ हजार ४०४ कोटींवर गेला. यंदा कोरोनामुळे प्रत्येक जण आर्थिक संकटात असला तरी कंपन्यांकडील प्रीमियमची वसुली ७३ हजार ९६५ कोटींवर झेपावली आहे. सर्वाधिक १६ टक्के घट मोटार विम्यात झाली असून, त्याखालोखाल मरिन विम्याचा (१४ टक्के) क्रमांक लागतो.
वैयक्तिक अपघात विम्यापोटी गतवर्षी २१०२ कोटी रुपयांचा प्रीमियम विमा कंपन्यांना मिळाला होता. यंदा त्यात ९ टक्के घट होऊन १ हजार ९१९ कोटी रुपये जमा झाले आहेत.

मोटार विम्याकडे दुर्लक्ष
यंदा मोटार विमा २२ हजार २५४ कोटी इतका कमी झाला आहे. तर दुसरीकडे कोराना प्रादुर्भावाच्या भीतीने आरोग्य विमा २२ हजार ९०३ कोटी झाला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The rate of personal accident insurance has dropped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.