शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गंगेच्या काठावरील रसुलाबाद घाटाचे नाव बदलले, शहीद चंद्रशेखर आझाद नावाने ओळखला जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 19:57 IST

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रयागराजमधील गंगा नदीच्या काठावर असलेल्या रसुलाबाद घाटाचे नाव बदलण्यात आले आहे. हा घाट आता चंद्रशेखर आझाद घाट, या नावाने ओळखला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेवरून प्रयागराज महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार याबाबतचा औपचारिक आदेश आठवडाभरात जारी करून तेथे नवीन दगडी स्लॅब बसविण्यात येणार आहे. रसुलाबाद घाट गंगा नदीच्या काठावर आहे. या घाटावर दररोज अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीद चंद्रशेखर आझाद यांच्यावरही याच घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळेच या घाटाला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रयागराज महानगरपालिकेने घाटाला नवीन नाव देण्याची सुरुवात 1991 मध्येच हाती घेतली होती. 1991 मध्ये महापालिका सभागृहाने नामकरणाचा ठराव केला होता. मात्र, 33 वर्षांपूर्वीचा प्रस्ताव मंजूर होऊनही अद्याप कोणताही औपचारिक आदेश काढण्यात आलेला नव्हता. सीएम योगी आदित्यनाथ 27 नोव्हेंबरला प्रयागराज दौऱ्यावर होते. दौऱ्यात त्यांनी महापालिकेलाही भेट दिली.

महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडला होता. मुख्यमंत्री योगी यांनी महापौर गणेश केसरवाणी आणि महापालिका आयुक्त चंद्र मोहन गर्ग यांना याबाबत योग्य तो निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर महापालिकेने तात्काळ कार्यवाही करत रसुलाबाद घाटाला शहीद चंद्रशेखर आझाद यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ