शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

अवकाळी पावसाने वाढला मलेरियाचा धोका

- सामान्यांत स्वाईन फ्लूनंतर मलेरियाची भीती
- लहान मुले, गरोदर महिलांना धोका संभवण्याची शक्यता
- नाले, गटारी, तलाव, सांडपाण्यात केली जातेय फवारणी

औरंगाबाद, दि. १३ - गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे सर्वदूर गारवा पसरला आहे. भर उन्हाळ्यात पाऊस कसा काय आला? या विचाराने सर्व नागरिक परेशान झाले आहेत. वातावरणाचा अंदाज येत नसून या पावसाने पिकांची नासधूस केली आहे. या पावसामुळे मलेरियाचा धोका मात्र संभवू शकतो. मलेरिया हा रोग प्लाज्मोडियम या जिवाणूमुळे पसरतो. हा जिवाणू एनाफिलीज मादी डासांमध्ये असतो. पावसाळ्याच्या दिवसांत हा रोग झपाट्याने पसरतो. सर्वसामान्यांना मलेरियाचा काही त्रास होऊ नये म्हणून फवारणी सुरू करण्यात आली आहे.

मुले व गर्भवतींना जास्त भीती
जगात दरवर्षी ४० ते ९० कोटी लोकांमध्ये ताप येण्याचे कारण मलेरिया आहे. यातील १० ते ३० लाख रुग्णांचा प्रतिवर्षी मृत्यू होतो. या आकडेवारीनुसार ३० सेकंदांत एक मृत्यू मलेरियामुळे होतो. यामध्ये पाच वर्षांची मुले आणि गरोदर महिलांचा अधिक समावेश आहे. त्यामुळे या दोघांना जास्तीत जास्त स्वत:ची काळजी घेणे जरूरी आहे.

दुप्पट होईल मृत्यूदर
१९९२ नंतर मलेरियाचे वाढते प्रमाण पाहता आतापर्यंत या प्रक्रियेत कसलीही कमतरता झाली नाही. जर अशीच परिस्थिती राहिली तर येत्या २० वर्षांत मलेरियामुळे होणार्‍या मृत्यूच्या दरांत दुपटीने वाढ झालेली असेल. बरेच रुग्ण हे ग्रामीण भागातून येतात. ते डॉक्टरकडे जात नाहीत किंवा त्यांना काय त्रास होतो आहे? हे लिहूनदेखील ठेवत नाहीत. त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर त्यालाही काय करावे ते समजत नाही.

(जोड आहे)