शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षापुर्वी केला होता बलात्कार, लग्नानंतर तिच्या पतीला पाठवला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 16:19 IST

पाच वर्षांपुर्वी अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूरमध्ये ही घटना घडली आहे. आरिफ असं आरोपीचं नाव आहे. पाच वर्षांपुर्वी त्याने तरुणीवर बलात्कार करुन आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने चित्रीकरण केलं होतं.

ठळक मुद्देअल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाला अटक पाच वर्षांपुर्वी तरुणीवर बलात्कार करुन दोन मित्रांच्या सहाय्याने केलं होतं चित्रीकरण लग्नानंतर तरुणीच्या पतीला चित्रीत केलेले व्हिडीओ आणि फोटो पाठवले

कोलार - पाच वर्षांपुर्वी अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. कोलार जिल्ह्यातील श्रीनिवासपूरमध्ये ही घटना घडली आहे. आरिफ असं आरोपीचं नाव आहे. पाच वर्षांपुर्वी त्याने तरुणीवर बलात्कार करुन आपल्या दोन मित्रांच्या सहाय्याने चित्रीकरण केलं होतं. तरुणीच्या लग्नानंतर त्याने हा व्हिडीओ तिच्या पतीला पाठवला. ज्यामुळे सहा महिन्यांपुर्वी त्यांचा घटस्फोट झाला. आरिफने मित्रांसोबत पुन्हा एकदा ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याने पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 

मुख्य आरोपी आरिफला अटक करण्यात आली असून, त्याचे मित्र तौशिफ आणि सय्यद फरार आहेत. दोघेही एका कार पेंटिंग गॅरेजमध्ये काम करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

2012 मध्ये आरिफ आपल्या शेजारी राहणा-या या तरुणीला घेऊन एका निर्मनुष्य ठिकाणी गेला होता. तिथे गेल्यावर त्याने तिच्या पेयात गुंगीचं औषध मिसललं आणि नंतर बलात्कार केला. तरुणीने आपल्या आई-वडिलांना बलात्कार झाल्याचं सांगितलं होतं. बदनामीच्या भीतीने त्यांच्यातील ज्येष्ठ लोकांनी बातचीत करुन मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. आरिफलाही तरुणीपासून लांब राहण्याची ताकीद देण्यात आली. 2015 मध्ये तरुणीचं हैदराबादमधील एका तरुणासोबत लग्न लावून देण्यात आलं. 

आरिफ मात्र अद्यापही तिच्या मागावर होता. त्याने तरुणीच्या पतीचा फोन क्रमांक मिळवला आणि आपल्याकडे तुझ्या पत्नीचे नग्न फोटो असून, तिच्यावर बलात्कार केला असल्याचं सांगू लागला. सुरुवातीला तरुणीच्या पतीने त्याला धुडकावून लावलं. म्हणून मग त्याने आपण चित्रीत केलेले व्हिडीओ आणि फोटो त्याला पाठवले. 

घटस्फोट झाल्यामुळे खचलेली तरुणी आपल्या माहेरी परतली. यावेळी आरोपी पुन्हा एकदा तिच्या संपर्कात आला आणि त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्रासलेल्या तरुणीने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरिफला अटक केली असून, त्याच्या मित्रांचा शोध घेत आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCrimeगुन्हाDivorceघटस्फोट